Badminton  sakal
क्रीडा

Badminton Asia Championships : भारताला ५८ वर्षांनंतर ऐतिहासिक सुवर्णपदक

चिराग शेट्टी - सात्विक रेड्डी आशियाई विजेते

सकाळ वृत्तसेवा

दुबई : गेल्या वर्षी जागतिक, राष्ट्रकुल, थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसह दोन वर्ल्ड टूअर स्पर्धांची अजिंक्यपदे पटकावणाऱ्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने रविवारी इतिहास रचला. सात्विक - चिराग जोडीने ओंग सिन - टिओ ई या मलेशियन जोडीवर पहिला गेम पराभूत झाल्यानंतरही पुढील दोन गेममध्ये विजय मिळवत आशियाई बॅडमिंटन ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

भारताला तब्बल ५८ वर्षांनंतर या स्पर्धेच्या सुवर्णपदकावर नाव कोरता आले. दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये पुरुष एकेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर सात्विक - चिराग जोडीने पुरुष दुहेरीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.

सात्विक - चिराग आणि ओंग सिन - टिओ ई यांच्यामधील पहिल्या गेममध्ये कमालीची चुरस दिसून आली. दोन्ही जोड्यांमध्ये ११-११ अशी बरोबरी झाली. त्यानंतर पहिला गेम २१-१६ असा जिंकण्यात मलेशियन जोडीला यश लाभले.

दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने ६-२ अशी आघाडी घेत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर भारतीय जोडीने मलेशियन जोडीशी बरोबरी करण्यात यश मिळवले. त्यामुळे १४-१४ अशी बरोबरी झाली. यानंतर सात्विक - चिराग जोडीने मागे वळून बघितले नाही. अखेर हा गेम २१-१७ असा जिंकण्यात भारतीयांना यश मिळाले. तिसऱ्या गेममध्येही मलेशियन जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. पण सात्विक - चिराग जोडीने सर्वस्व पणाला लावत खेळ केला व हा गेम २१-१९ असा खिशात टाकला. २० लाखांचे बक्षीस भारतीय बॅडमिंटन संघटनेकडूनही भारतीय खेळाडूंना २० लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Special Sitting Schedule : संसदेचे ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान विशेष कामकाज! लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठकांबाबत किरेन रिजिजू यांची अधिकृत घोषणा

Property Card: फ्लॅट खरेदी-विक्री करायचाय? मग ही बातमी वाचाच! सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ७ कोटी घरमालकांना होणार फायदा

IND A vs SL A, Semi-Final: वैभव-अभिषेकची वादळी खेळी अन् मग तिलक - शाहबाजची फिफ्टी; भारताचे श्रीलंकेसमोर मोठे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Record Gold Donation : तिरुपती बालाजीच्या चरणी भक्तीचा अनोखा महासागर! चेन्नईच्या जैन दाम्पत्याने अर्पण केले तब्बल १२१ किलो सोने अन् २३८ कॅरेट हिरे; किंमत पाहून व्हाल थक्क!

Latest Marathi News Live Update: ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर रामदास कदमांचा नवा दावा; 'माझ्याकडे आणखी...'

SCROLL FOR NEXT