Badminton Asia Championships  sakal
क्रीडा

Badminton Asia Championships : भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाची झुंज ; आशियाई सांघिक बॅडमिंटन

भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाला गुरुवारी झालेल्या ‘अ’ गटातील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत चीनकडून ३-२ अशा फरकाने हार पत्करावी लागली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष बॅडमिंटन संघाला गुरुवारी झालेल्या ‘अ’ गटातील साखळी फेरीच्या अखेरच्या लढतीत चीनकडून ३-२ अशा फरकाने हार पत्करावी लागली. भारतीय संघ पराभूत झाला असला तरी त्यांनी चीनला कडवी झुंज दिली. भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून दोन्ही संघांच्या या लढती उद्या (ता. १६) खेळवण्यात येणार आहेत.

चीनविरुद्धच्या पहिल्या लढतीत एच. एस. प्रणोय याने वेंग हाँग यांग याच्याविरुद्धच्या लढतीत पहिला गेम ६-२१ असा गमावल्यानंतर पुढील दोन गेममध्ये २१-१८, २१-१९ असे यश मिळवले आणि भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीच्या लढतीत एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. चेन यांग व लिऊ यी या जोडीकडून भारतीय जोडीला १५-२१, २१-१९, १९-२१ अशाप्रकारे मात सहन करावी लागली. लक्ष्य सेन याने मात्र एकेरीच्या लढतीत लेई लॅन शी याच्यावर २१-११, २१-१६ असा सहज विजय नोंदवला आणि भारताला २-१ असे पुढे नेले.

भारतीय संघ या लढतीत पुढे असूनही पुढील दोन लढतींमध्ये पराभव झाल्यामुळे चीनकडून हार पत्करावी लागली. सूरज गोआला-पृथ्वी रॉय या जोडीला दुहेरीच्या लढतीत रेन शियान-शी हाओ नॅन यांच्याकडून २१-१३, २१-९ अशा नामुष्कीचा सामना करावा लागला. अखेरच्या लढतीत वँग झेंग याने चिराग सेनला नमवले.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढती आज रंगणार

भारताचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. भारतीय पुरुष तसेच महिला या दोन्ही संघांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती उद्या होणार आहेत. भारताचा पुरुष संघ ‘अ’ गटातून उपविजेता ठरला. तसेच महिला संघ डब्ल्यू गटातून पहिल्या स्थानावर राहिला. महिला संघासमोर मलेशियाचे आव्हान असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT