Priyanshu Rajawat sakal
क्रीडा

Badminton Competition : जागतिक टूअर ३०० मालिका पहिल्यांदाच भारताच्या प्रियांशू राजवतने जिंकली

भारताचा २१ वर्षीय बॅडमिंटनपटू प्रियांशू राजवत याने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली.

सकाळ वृत्तसेवा

भारताचा २१ वर्षीय बॅडमिंटनपटू प्रियांशू राजवत याने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली.

ऑर्लिन्स (फ्रान्स) - भारताचा २१ वर्षीय बॅडमिंटनपटू प्रियांशू राजवत याने रविवारी संस्मरणीय कामगिरी केली. त्याने अंतिम फेरीच्या लढतीत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहानसन याला २१-१५, १९-२१, २१-१६ असे पराभूत करीत ऑर्लिन्स बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. जागतिक टूअर ३०० मालिका त्याने पहिल्यांदाच जिंकली हे विशेष.

भारताच्या बॅडमिंटन संघाने २०२२ मध्ये थॉमस करंडक जिंकला होता. या ऐतिहासिक विजय संपादन करणाऱ्या भारताच्या संघात प्रियांशू याचाही समावेश होता. मध्य प्रदेशमध्ये जन्म झालेल्या प्रियांशू व मॅग्नस यांच्यामधील लढतीच्या पहिल्या गेममध्ये ६-६ अशी बरोबरी होती, पण त्यानंतर प्रियांशू याने आपला खेळ उंचावला आणि १८-११ अशी आघाडी घेतली. पहिला गेम प्रियांशू जिंकणार असे वाटत असतानाच त्याच्याकडून चुका झाल्या. त्यामुळे प्रियांशूला सलग चार गुण मिळाले. मॅग्नसनेही १८-१५ अशी आघाडी कमी केली, पण प्रियांशू याने त्यानंतर झोकात पुनरागमन केले व २१-१५ असा पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेमच्या ब्रेकला मॅग्नस याच्याकडे ११-८ अशी आघाडी होती. त्यानंतर दोन खेळाडूंमध्ये १४-१४ असा स्कोअर झाला. प्रियांशूने गुण मिळवत पहिल्यांदाच या गेममध्ये १५-१४ अशी आघाडी मिळवली. या गेममध्ये प्रियांशूकडून झालेल्या चुकांचा मॅग्नस याला फायदा झाला. मॅग्नस याने २१-१९ असा गेम जिंकत लढतीत १-१ अशी बरोबरी साधली.

तिसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही खेळाडूंमध्ये ९-९ अशी बरोबरी होती, पण त्यानंतर प्रियांशूने २ गुण घेत ११-९ अशी आघाडी मिळवली. यानंतर भारताच्या पठ्ठ्याने मागे वळून बघितले नाही. अखेर २१-१६ असा अखेरचा गेम जिंकत मालिकाही आपल्या नावावर केली.

ऑर्लिन्स स्पर्धा मी पहिल्यांदाच जिंकली आहे. त्यामुळे साहजिकच माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भारत देशातील बॅडमिंटनप्रेमींचाही मला नेहमीच सपोर्ट राहिला आहे. त्यांचाही आभारी आहे.

- प्रियांशू राजवत, विजेता, ऑर्लिन्स मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT