HS Prannoy Badminton World Championships ESAKAL
क्रीडा

HS Prannoy : प्रणॉयने गतविजेत्याला दिला पराभवाचा धक्का; जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं पदक निश्चित

अनिरुद्ध संकपाळ

HS Prannoy Badminton World Championships : भारताचा बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत दोनवेळच्या माजी विजेत्या डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनचा पराभव करत पदक निश्चित केले. 68 मिनिटे चाललेल्या क्वार्टर फायनलमध्ये प्रणॉयने पदक निश्चित केले. प्रणॉय आता सेमी फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत तिसरे मानांकन असलेल्या कुनलावूत विट्रीडसॅरनशी भिडणार आहे. हा सामना उद्या होणार आहे.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात प्रणॉयने झुंजार खेळ कर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या एक्सेलसनचा 13-21, 21-15, 21-16 असा पारभव केला. विशेष म्हणजे एक्सेलसन हा त्याच्या घरच्या चाहत्यांसमोर खेळत होता.

केरळच्या 31 वर्षाच्या प्रणॉयने या वर्षी मलेशिया मास्टर्स सुपर 500 आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 ची फायनल गाठली होती. त्याने आपली दमदार कामगिरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवत भारताचे 14 वे पदक निश्चित केले.

भारताने आतापर्यंत वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 14 पदके जिंकली आहेत. त्यातील 5 पदके ही एकट्या पी. व्ही. सिंधूने जिंकली आहेत. यात 2019 मधील सुवर्ण पदकाचा देखील समावेश आहे.

सायना नेहवालने (रौप्य, कांस्य) दोन, किदंबी श्रीकांत (रौप्य), लक्ष्य सेन (कांस्य), बी साई प्रनीथ (कांस्य) आणि प्रकाश पदुकोन (कांस्य) यांनी प्रत्येकी एक पदक जिंकले आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT