World Badminton Championship 
क्रीडा

World Badminton Championship: सात्विक-चिराग जोडीने कांस्यपदक जिंकून रचला इतिहास

भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे

Kiran Mahanavar

World Badminton Championship : भारताच्या सात्विक आणि चिराग यांनी जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताला पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. भारताचे कांस्यपदक निश्चित झाले आणि रौप्य किंवा सुवर्णपदकाची आशा संपुष्टात आली. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी आहे. यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा यांनी 2011 मध्ये या स्पर्धेत पदक जिंकले होते.

उपांत्य फेरीत मलेशियाच्या चिया आणि यिक यांनी सात्विक चिरागचा 20-22, 21-18, 21-16 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. भारतीय जोडीने पहिल्या गेममध्ये चमकदार कामगिरी करत 22-20 अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीचा 18-21 अशा फरकाने पराभव झाला. भारतीय जोडीने शेवटचा आणि निर्णायक गेम 16-21 अशा फरकाने गमावला. यासह भारताची सुवर्णपदक जिंकण्याची आशा संपुष्टात आली.

सात्त्विक - चिराग जोडीने ताकुरो होकी - युगो कोबायाशी या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या जपानच्या जोडीचे आव्हान परतवून लावले. सातव्या मानांकित सात्त्विक - चिराग या भारताच्या पट्ट्यांनी पहिला गेम 24-22 अशा फरकाने जिंकल्यानंतर जपानच्या जोडीने दुसरा गेम 21-15 अशा फरकाने जिंकला. तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने झोकात पुनरागमन करीत 21-14 असे यश संपादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

आजचे राशिभविष्य - 16 सप्टेंबर 2026

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

SCROLL FOR NEXT