Badminton ESAKAL
क्रीडा

भारतीयांसमोर खडतर आव्हान

टोकियोमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २२ ऑगस्टपासून

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकणाऱ्या भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर २२ ऑगस्टपासून टोकियोमध्ये सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेमध्ये खडतर आव्हान असणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी जाहीर करण्यात आला. यावेळी भारतीय खेळाडूंना कठीण ड्रॉचा सामना करावा लागणार आहे.

सिंधू हिने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला होता. यंदा तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. सिंधूला सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये हॅन यूए व वँग झी ई या दोन खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या ॲन सी यंग या बॅडमिंटनपटूंशी तिला दोन हात करावे लागणार आहेत.

साईना नेहवालला हाँगकाँगच्या च्युअँग यी हिचा सामना करावा लागणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास साईनाला पुढील फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहराचे आव्हान असणार आहे. मालविका बनसोडला डेन्मार्कच्या ख्रिस्तोफरसन हिच्याशी दोन हात करावे लागणार आहेत.

श्रीकांत, लक्ष्य, प्रणॉय एकाच हाफमध्ये

महिलांप्रमाणे पुरुषांच्या एकेरीतही भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. किदांबी श्रीकांत, लक्ष्य सेन व एच. एस. प्रणॉय हे भारतीय खेळाडू एकाच हाफमध्ये आहेत. त्यामुळे भारताचा एकच खेळाडू उपांत्य किंवा अंतिम फेरीपर्यंत आगेकूच करू शकणार आहे. याशिवाय बी. साईप्रणीत हा भारताचा चौथा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाला आहे.

दुहेरीतही तीच परिस्थिती

भारतीय खेळाडूंसाठी दुहेरी विभागातही तीच परिस्थिती असणार आहे. सात्विक रेड्डी व चिराग शेट्टी या जोडीला मलेशिया व जपान या देशांमधील स्टार खेळाडूंना त्यांना सामोरे जावे लागेल. गायत्री गोपीचंद-ट्रीसा जॉली या भारतीय जोडीसमोर सुवर्णपदक जिंकलेल्या पिअर्ली टॅन- तिन्नाह मुरलीधरन यांचे आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नांदेड हादरलं! घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आई-वडिलांचा मृतदेह; दोन्ही मुलांनीही रेल्वेखाली उडी मारुन स्वत:ला संपवलं

Latest Marathi News Live Update : निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवले

Atal Bihari Vajpayee : अटल बिहारी यांना महिला पत्रकाराने घातली होती लग्नाची मागणी, हुंड्यात मागितला होता पाकिस्तान; नेमका काय आहे किस्सा?

Utkarsh Amitabh : रात्री बसून दिल्लीच्या मुलाने AI वरून कमावले अडीच कोटी; एका तासाला होते 18 हजार कमाई, काय आहे ही ट्रिक?

Gold Rate Today : सोनं–चांदीचा नवा उच्चांक! ५ दिवसांत तब्बल २०,००० रुपयांची वाढ; पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT