Pune Half Marathon 2022 
क्रीडा

Pune Half Marathon 2022 : पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये 'या' दिग्गजांनी मारली बाजी!

बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन रविवारी तिसरा अध्याय साकारला

सकाळ ऑनलाईन टीम

Pune Half Marathon 2022 : 'आरोग्याचा जागर. धावण्याची जिगर' प्रदर्शित करीत पहिले पुष्प गुंफलेली, दुसऱ्या अध्यायात तन-मन-धन 'अपंत 'फन रन' अशी मौजमजा लुटणारे चित्र साकारलेली बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन रविवारी तिसरा अध्याय साकारला आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य स्टेडियमवर प्रारंभ आणि सांगता होणाऱ्या हाफ मॅरेथॉनसह चार गटांमध्ये हजारो पुणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील निशाण दाखवतील आणि दोन वर्षांच्या खंडानंतर तिसऱ्या स्पर्धेला जोशात प्रारंभ झाला.

या स्पर्धेत या वेळी राष्ट्रीय विक्रमासाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांचे खास बक्षीस ठेवण्यात आले होते. स्पर्धेचा पहिला अध्याय 2018 मध्ये पार पडला होता. त्यानंतर 2019 मध्ये दुसरी स्पर्धा झाली. कोरोनामुळे दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर या वेळी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा मुख्य स्टेडियमवर प्रारंभ आणि सांगता होणार आहे. त्या वेळी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी हजारो पुणेकर उपस्थित राहतील. त्यासाठी मुख्य स्टेडियम सुसज्ज करण्यात आले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची सफाई आणि सुशोभीकरण पार पडले आहे. धावपटूंसाठी ठिकठिकाणी संयोजकांनी ढोल-ताशा पथकांची व्यवस्था केली होत.

पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची नावे :

  • 21 किलोमीटर धावणे : पुरुष

    दीपक रावत

    दीपक कुंभार

    हुकाम सिंग

  • 21 किलोमीटर धावणे : महिला

    रेश्मा दत्तू

    नंदिनी गुप्ता

    कविता यादव

  • 10 किलोमीटर धावणे : पुरुष

    रोहित वर्मा

    श्रीनू बुगठा

    अंकित देशवाल

  • 10 किलोमीटर धावणे : महिला

    शशीलता ठाकूर

    अर्पिता साईनी

    ज्योती चौहान

  • 5 किलोमीटर धावणे : पुरुष

    धुरादेव गारगे

    तेजस पवार

    अक्षय चौहान

  • 5 किलोमीटर धावणे : महिला

    श्रुती रेडेकर

    रोहिणी पाटिल

    गायत्री शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT