IND vs Pak Twitter
क्रीडा

नीरज-अर्शद यांच्यासंदर्भातील चर्चेवर बजरंगनं ठोकला शड्डू

माझ्या नावाचा उपयोग करुन कोणताही अजेंडा साध्य करण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंती करत पाकिस्तानी खेळाडूसोबत कोणतेही मतभेद नाहीत असे स्पष्ट केले होते.

सुशांत जाधव

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदिम यांच्यातील ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यानची एक घटना सध्या चांगलीच चर्चेत आहे. नीरज चोप्राच्या एका मुलाखतीचा आधार घेऊन सोशल मीडियावर भारत-पाक यांच्यातील तिरस्काराची भावना पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. खुद्द नीरज चोप्राने यासंदर्भात देशवासियांना विनंती केल्याचीही पाहायला मिळाले. माझ्या नावाचा उपयोग करुन कोणताही अजेंडा साध्य करण्याचा प्रयत्न करु नका, अशी विनंती करत पाकिस्तानी खेळाडूसोबत कोणतेही मतभेद नाहीत असे स्पष्ट केले होते.

याप्रकरणात आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ पदक मिळवून देणारा कुस्तीपटू बजरंगही उतरला आहे. त्याने नीरज चोप्राच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बजरंग पुनिया म्हणाला की, नीरज चोप्राच्या मुलाखतीचा आधार घेत पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदिमसोबत वादग्रस्त मुद्दा तयार करण्यात येत आहे. अ‍ॅथलिट पाकिस्तानचा असो किंवा अन्य कोणत्याही देशाचा तो आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करत असतो. आम्ही मॅटवर किंवा मैदानात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलो तरी मैदानाबाहेर आम्ही बंधुत्वाचे नाते जपतो. खेळ आम्हाला भेदभाव कधीच शिकवत नाही. खेळातून एकजुटतेला प्रोत्साहन दिले जाते, असे बजरंग पुनियाने म्हटले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेच्या भालाफेक क्रीडा प्रकाराच्या फायनल इवेंटमध्ये भारताचा नीरज चोप्रासोबतच पाकिस्तानचा अर्शद नदिमही पात्र ठरला होता. फायनलमध्ये नीरज चोप्राने सर्वाधिक लांब भाला फेकत सुवर्ण पदकाची कमाई केली. या यशानंतर त्याने अर्शदचा उल्लेखही केला होता. माझ्यासोबत मेडल स्वीकारताना अर्शद नदिम असायला हवा होता, असे नीरज चोप्राने म्हटले होते. या गोष्टीची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा नीरजच्या एका मुलाखतीची रंगली.

या मुलाखतीमध्ये नीरज चोप्राने अंतिम फेरीतील इवेंटमध्ये झालेला एक किस्सा शेअर केला होता. भाला फेकण्यासाठी तयार झालो पण मला भाला मिळत नव्हता. माझा नंबर आल्यानंतर मी शोधाशोध करत होता. माझा भाला अर्शदच्या हाती दिसला. मी त्याच्याकडे जाऊन तो घेतला. यासर्व प्रकारात पहिल्या प्रयत्नात भालाफेकताना गडबड गोंधळ उडाला, असे नीरज चोप्राने म्हटले होते. त्याच्या या मुलाखतीनंतर अनेकजण पाकिस्तानी खेळाडूला ट्रोल करण्यास सुरुवात केली. ऑलिम्पिक स्पर्धेतही पाकिस्तानच्या खेळाडूने भारताच्या खेळाडूविरुद्ध रडीचा डाव खेळल्याचे बोलले गेले. सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगली. नीरजने या चर्चेला पूर्णविराम दिला. त्याने यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करुन उगाचच नको त्या अफवा पसरु नका, असे म्हटले होते. त्यानंतर नीरजच्या भूमिकेचे पाकिस्तानमधूनही कौतुक झाले. आता भारताचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटूनेही त्याच्या सूरातसूर मिसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT