Bajrang Punia esakal
क्रीडा

Bajrang Punia : बजरंग, दीपक पुनियाने वर्ल्ड चॅम्पियनशिप चाचणीवर मारली फुली; मात्र नाराज SAI ने वाढवंल त्यांच टेन्शन

अनिरुद्ध संकपाळ

World Championship Bajrang Punia : ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कॉमनवेल्थ चॅम्पियन दीपक पुनिया यांनी बेलग्रेड येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीतून माघार घेतली आहे. पुढच्या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठी ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा महत्वाची आहे.

बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघाचे विद्यमान अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केले होते. या आंदोलनात विनेश फोगाट, साक्षी मलिक या महिला कुस्तीपटू देखील आघाडीवर होत्या. या दोघी देखील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार नाहीयेत.

जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपची निवड चाचणी ही 25 आणि 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडचाचणीचे आयोजन अॅड - हॉक समितीने केले आहे. बजरंग आणि दीपक पुनिया या वेळेत विदेशात सरावासाठी जाणार आहेत. त्यामुळेच त्यांनी सराव सत्रात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

बजरंग पुनिया गुरूवारी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला (SAI) एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात कजाकिस्तानमध्ये 39 दिवसांच्या कॅम्पदरम्यान एशियन गेम्समध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. याच प्रकारे दीपकनेही 35 दिवसांच्या सराव सत्राची परवानगी मागितली होती.

त्यांनी या दोन वरिष्ठ कुस्तीपटूंना जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. साई या निर्णयावर खूष नाही. साई म्हणते की, तुम्हाला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीत सहभागी न होण्यामागचे कारण द्यावे लागेल. तुमचे विदेशातील सराव सत्र आणि चाचणी हे एकाचवेळी येत आहे. त्यामुळे तुम्हाला चाचणीवेळी गैरहजर राहण्याचे कारण सांगावे लागणार आहे.

बजरंग पुनियाला एशियन गेम्सच्या चाचणीतूनही सूट मिळाली होती. यानंतर मोठे वादंग निर्माण झाले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT