Bajrang Punia sakal
क्रीडा

Bajrang Punia : अपात्रतेनंतरही पुनियाला मंत्रालयाकडून मदत

पॅरिस ऑलिंपिकसाठी अपात्र ठरल्यानंतरही बजरंग पुनिया याला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक यांचा करार वाढवण्याची त्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिंपिकसाठी अपात्र ठरल्यानंतरही बजरंग पुनिया याला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक यांचा करार वाढवण्याची त्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून याप्रसंगी सांगण्यात आले, की बजरंग पुनियाचे प्रशिक्षक काझी मुस्तफा यांच्यासोबतचा करार २४ मे २०२४ पर्यंत वाढवण्याला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, बजरंग पुनिया याने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती.

त्याच्यासह आणखी काही कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेविरोधात आंदोलनही केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशियाई व ऑलिंपिक पात्रता फेरीत तो ६५ किलो वजनी गटात अंतिम चार फेरीपर्यंत पोहोचला नाही.

त्यामुळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याच्या त्याच्या आशांना सुरुंग लागला. बजरंग पुनियासह टेबल टेनिस खेळाडू श्रीजा अकुला, मानस ठक्कर, पयास जैन, ज्युडो खेळाडू तुलिका मान यांच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT