Bajrang Punia sakal
क्रीडा

Bajrang Punia : बजरंगच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या आशांना सुरुंग ; जागतिक कुस्ती संघटनेकडूनही निलंबनाची कारवाई

राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेकडून (नाडा) काही दिवसांपूर्वी निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता भारताचा अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा पाय आणखीनच खोलात गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संघटनेकडून (नाडा) काही दिवसांपूर्वी निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आता भारताचा अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. जागतिक कुस्ती संघटनेकडूनही त्याला निलंबित केले असून या वर्षअखेरीसपर्यंत त्याच्यावरील निलंबन कायम राहणार आहे. यामुळे आता पॅरिस ऑलिंपिकमध्ये प्रवेश करण्याच्या त्याच्या आशांना सुरुंग लागला आहे.

उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्यामुळे नाडाकडून बजरंग पुनियाच्या निलंबनाच्या शिक्षेचा कठोर निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बजरंगवरील निलंबनाचा निर्णय घेताना आम्हाला अंधारात ठेवण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले होते.

याप्रसंगी या प्रकरणाबाबत जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेला (वाडा) पत्र लिहिणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी सोनीपत येथे १० मार्च रोजी निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत पराभूत झाल्यानंतर बजरंग तडकाफडकी तेथून निघून गेला.

नाडाला उत्तेजक नमुना चाचणीही त्याच्याकडून देण्यात आली नाही. त्यामुळे नाडाकडून २३ एप्रिलला त्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर उत्तर देण्यासाठी बजरंगला काही दिवसांचा अवधी देण्यात आला होता. बजरंग याच्या वकिलाकडून नाडाला उत्तर देण्यात आले आहे.

जागतिक कुस्ती संघटनेकडून थेट संवाद नाही

जागतिक कुस्ती संघटनेकडून निलंबनाच्या शिक्षेबद्दल थेट बजरंग पुनियाशी संपर्क साधण्यात आला नाही. त्यांच्या सिस्टीममध्ये बजरंगच्या निलंबनाबद्दल प्रसिद्ध करण्यात आले आहे. नाडाकडून त्याला निलंबित करण्यात आल्यामुळे आमच्याकडूनही निलंबनाचा निर्णय घेण्यात आल्याचे जागतिक कुस्ती संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price Hike India : सामान्यांच्या खिशाला कात्री ! प्रिमियम पेट्रोल अन् डिझेलच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

IPL 2026: श्रेयस अय्यर सामन्यांना मुकणार? पंजाबच्या विजयानंतर स्वत:च दिली दुखापतीवर महत्त्वाची अपडेट

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण तापलं; जैन समाजाच्या फसवणुकीचा आरोप, कारवाईची मागणी

Pune Crime: चाकणला गॅस टँकरमधून बेकायदा गॅस भरणा; तिघांना पोलिसांनी केली अटक, ४९ लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा घेणार निरोप, मराठमोळ्या अभिनेत्रीचं होणार नुकसान, नक्की कारण काय?

SCROLL FOR NEXT