Corona
Corona esakal
क्रीडा

SLvsBAN : सामन्याआधी खेळाडू निघाले पॉझिटिव्ह

नामदेव कुंभार

श्रीलंकेचा संघ सध्या बांगलदाश दौऱ्यावर आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात तीन एकदिवसीय सामन्याची मालिका सुरु आहे. यातील पहिल्या सामन्यापूर्वी श्रीलंके संघाच्या चमूतील तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फो याबाबतचं वृत्त दिलं आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात अनुक्रमे 23 मे, 25 मे आणि 28 मे रोजी तीन सामने होणार आहेत. तीन सामन्याची एकदिवसीय मालिका विश्वकप सुपर लीगचा भाग आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्ट्सनुसार, 'बांग्लादेशविरोधात ढाका येथे होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी श्रीलंका संघातील दोन खेळाडू आणि कोच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.'

खेळाडू आणि कोच यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही सामना थांबवण्यात आला नाही. निर्धारित वेळेत सामना घेण्यात आला आहे. बांगलादेश आणि श्रीलंका संघानं हा निर्णय घेतला. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, श्रीलंका संघाचा गोलंदाजी कोच चमिंडा वास याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघानं 33 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 143 धावा केल्या आहेत. तमिम इक्बाल 52 धावा काढून बाद झाला. तर Mushfiqur Rahim 53 धावांवर खेळत आहे. श्रीलंकाकडून धनंजय डिस्ल्वानं दोन बळी घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT