bangladesh beat afghanistan 
क्रीडा

BAN vs AFG : भारत-पाकला जमलं नाही, ते बांग्लादेशने करून दाखवलं, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

बांगलादेशने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास! 21व्या शतकातील नोंदवला सर्वात मोठा विजय

Kiran Mahanavar

BAN vs AFG : बांगलादेश क्रिकेट संघाने शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळला गेलेला एकमेव कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. मीरपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात चौथ्या दिवशीच बांगलादेशने विजय मिळवला. बांगलादेशने शनिवारी अफगाणिस्तानचा 546 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात मोठा कसोटी विजय नोंदवला आहे.

तिसऱ्या दिवशी बांगलादेशने आपला दुसरा डाव 425 धावांवर घोषित करत अफगाणिस्तान संघाला 662 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात 115 धावांत गारद झाला. तर पहिल्या डावात संघाने केवळ 146 धावा केल्या.

बांगलादेश संघाने हा सामना 546 धावांनी जिंकला, जो कसोटी सामन्यातील धावांच्या बाबतीत तिसरा सर्वात मोठा विजय आहे. त्याचबरोबर हा 21 व्या शतकातील सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभव केला होता.

बांगलादेशच्या या विजयात फलंदाजांसोबतच गोलंदाजांनीही मोलाचा वाटा उचलला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने अफगाणिस्तानला फॉलोऑन न होऊ देत दुसऱ्या डावात स्वत: खेळण्याचा निर्णय घेतला होता. जर त्याने हे केले नसते तर कदाचित हा विक्रम झाला नसता आणि बांगलादेशचा संघ हा सामना एका डावाने जिंकू शकला असता.

कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय (धावांच्या बाबतीत)

  • इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा 675 धावांनी पराभव केला, 1928

  • ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 562 धावांनी पराभव केला, 1934

  • बांगलादेशने 2023 मध्ये अफगाणिस्तानचा 546 धावांनी पराभव केला.

  • ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 530 धावांनी पराभव केला, 1911

  • दक्षिण आफ्रिकेने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 492 धावांनी पराभव केला.

नजमुल हसन शांतोनेही इतिहास रचला

नजमुल हसन शांतोनेही या सामन्याच्या दोन्ही डावात 146 आणि 124 धावा करत शतके झळकावून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा तो बांगलादेशचा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी मोमिनुल हकने ही कामगिरी केली होती. याशिवाय या सामन्यात बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, इबादत हुसेन आणि तस्किन अहमद यांनी शानदार गोलंदाजी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Latest Marathi News Live Update : सभांना गर्दी मिळते पण मत नाही : राज ठाकरे

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

SCROLL FOR NEXT