Bangladesh Cricket Board 
क्रीडा

Asia Cup 2023 : सुपर 4 आधी संघाला मोठा धक्का! स्टार फलंदाज स्पर्धेतून बाहेर, सलामीवीरची संघात एंट्री!

Kiran Mahanavar

Bangladesh Team Update : आशिया कप सुपर 4 आधी बांगलादेशला मंगळवारी मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज नझमुल हुसेन शांतो हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या मते, शांतो तात्काळ बांगलादेशला गेला आहे आणि पुढील महिन्यात भारतात सुरू होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकापूर्वी पुनर्वसन करेल.

अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासचा मंगळवारी वैद्यकीयदृष्ट्या क्लिअर झाल्यानंतर शांतोच्या जागी बांगलादेशच्या संघात समावेश करण्यात आला. लिटन याआधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडला होता.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान शांतोला दुखापत झाली. शांतोने या सामन्यात 104 धावांची शानदार खेळी केली ज्यामुळे बांगलादेशचा 89 धावांनी विजय झाला.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) वैद्यकीय संघाने शांतोला विश्रांतीचा सल्ला दिला आहे, कारण पुढील महिन्यापासून विश्वचषकही खेळवला जाणार आहे. शांतो हा बांगलादेशसाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे.

बांग्लादेश संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम खान म्हणाले, 'शांतोने फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगची तक्रार केली होती, त्यामुळे तो क्षेत्ररक्षण करू शकला नाही. आम्ही एमआरआय केले. सावधगिरी म्हणून शांतो आशिया चषकाचे उर्वरित सामने खेळणार नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT