Bangladesh Vs India Test 2nd Test Day 3 esakal
क्रीडा

BAN vs IND : रात्र वैऱ्याची! मेहदीने भारताची टॉप ऑर्डर उडवली; 45 धावा करतानाही झाली दमछाक

अनिरुद्ध संकपाळ

Bangladesh Vs India Test 2nd Test Day 3 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान मिळाले. मात्र बांगलादेशचा फरकीपटू मेहदी हसन मिराजने भारताची टॉप ऑर्डर अवघ्या 45 धावात उडवत भारताची आजची रात्र वैऱ्याची ठरवली. मेहदीने शुभमन गिल(7), चेतेश्वर पुजारा (6) आणि विराट कोहलीची (1) शिकार केली. शाकिबने केएल राहुलला बाद केले. आता भारताला उद्या विजयासाठी 100 धावा करायच्या आहेत. भारताचा अक्षर पटेल 26 तर नाईट वॉचमन जयदेव उनाडकट 3 धावा करून नाबाद आहेत.

तत्पूर्वी, भारताने बांगलादेशचा 231 धावात गुंडाळला. बांगलादेशकडून लिटन दास (73) आणि झाकीर हसनने (51) झुंजार फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी 145 धावांचे आव्हान ठेवले. मात्र भारताच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशने आपला दुसरा डाव 6 धावांपासून पुढे नेला. भारताने पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या दिवशी बांगलादेशचा दुसरा डाव गडगडण्यास सुरूवात झाली.

भारताच्या उमेश, अश्विन उनाडकटने बांगलादेशची अवस्था 3 बाद 51 अशी केली. त्यानंतर अक्षर पटेलने आपला जलवा दाखवत मुशफिकूर रहीमला 9 धावांवर बाद केले. दरम्यान, झाकीर हसन आणि लिटन दास यांनी झुंजार फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न उमेश यादवने झाकीरला 51 धावांवर बाद करत हाणून पाडला. त्यानंतर अक्षरने मेहदी हसन मिराजला शुन्यावर बाद करत बांगलादेशला 113 धावांवर सहावा धक्का दिला.

यानंतर लिटन दास आणि नुरूल हसनने भागीदारी रचत भारताला दुसऱ्या डावात आव्हानात्मक टोटल देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने नुरूल हसनला 31 धावांवर बाद करत सातव्या विकेटसाठीची ही 46 धावांची भागीदारी तोडली. दरम्यान, चहापानापर्यंत लिटन दासने अर्धशतकी खेळी करत बांगलादेशला 195 धावांपर्यंत पोहचवले.

चहापानानंतर लिटन दास आणि टस्किन अहमदने आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचत बांगलादेशला 200 च्या पार पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला 73 धावांवर बाद केले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव लगेच संपेल असे वाटले होते. मात्र टस्किन अहमदने फटकेबाजी करत बांगलादेशला 231 धावांपर्यंत पोहचवले. अखेर खलील अहमद 4 धावांवर धावबाद झाला अन् बांगलादेशचा डाव 231 धावांवर संपला. टस्किन अहमदने नाबाद 31 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT