India vs Bangladesh 2nd Test Day-1 Umesh Yadav esakal
क्रीडा

BAN vs IND : उमेश यादव म्हणजे आशियातला वाघ! बांगलादेशला पहिल्याच दिवशी गुंडाळले

अनिरुद्ध संकपाळ

India vs Bangladesh 2nd Test Day-1 : भारताने बांगलादेशचा पहिला डाव पहिल्याच दिवशी 227 धावांवर संपवला. भारताकडून उमेश यादवने 4 तर अश्विनने 4 विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. 12 वर्षानंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या जयदेव उनाडकटनेही 2 विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून मोमिनूल हकने झुंजार खेळी करत 84 धावा केल्या. भारताने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात बिनबाद 19 धावा केल्या. उमेश यादवने आजच्या सामन्यात भागीदारी तोडण्याचे काम केले.उमेश यादवने तो आशियाई खेळपट्ट्यांवर भारताचा सर्वात चांगला गोलंदाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.

भारत बांगलादेश दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला पाठोपाठ धक्के देण्यास सुरूवात केली. तब्बल 12 वर्षानंतर कसोटी संघात परतलेल्या जयदेव उनाडकट आणि आर. अश्विनने भेदक मारा करत बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली. उमेश यादवनेही या दोघांना चांगली साथ देत पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत बांगलादेशची अवस्था 5 बाद 172 धावा अशी केली. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी बांगलादेशच्या 57 षटकात 5 बाद 184 धावा झाल्या होत्या.

चहापानानंतर मोमिनूल हकने बांगलादेशला 200 चा टप्पा पार करून दिला. मात्र ब्रेकनंतर भारताच्या उमेश यादवने बांगलादेशला दोन धक्के देत त्यांचा डाव गुंडाळण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. त्याने मेहदी हसन मिराजला 15 तर नुरूल हसनला 6 धावांवर बाद करत बांगलादेशची अवस्था 7 बाद 219 अशी केली.

उमेश यादवने चहापानानंतर बांगलादेशला धक्के देणे सुरूच ठेवले. त्याने टस्किन अहमदला 1 धावांवर बाद करत आपला चौथा बळी टिपला. अश्विनने बांगलादेशचा झुंजार फलंदाजी करणाऱ्या मोमुनिल हकला 84 धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर खालेद अहमदला शुन्यावर बाद करत बांगलादेशचा डाव 227 धावांवर संपवला. अश्विनने 71 धावात 4 तर उमेश यादवने 25 धावात 4 बळी टिपले. त्यांना जयदेव उनाडकटने 2 विकेट घेत चांगली साथ दिली.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deglur Accident : बस व ट्रॅव्हल्स समोरासमोर अपघात २८ जण गंभीर जखमी, लेंडी पुला जवळील घटना; २ तास वाहतूक खोळंबंली

'२०२७ वनडे वर्ल्ड कप जिंकायचा असेल, तर आगरकर - गंभीरला पदावरून हटवा!', Navjot Singh Sidhu खरंच असं म्हणाले? स्वत:च केला खुलासा

Diwali Celebration : ऑपरेशन पहाट; सोलापूर पोलिसांनी पारधी कुटुंबांसोबत साजरी केली दीपावली, शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Actor Asrani Passes Away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्र्यांसमोर शरण गेलेला भूपती गद्दार, त्याला धडा शिकवणार! माओवाद्यांनी जारी केलं पत्रक, नेमकं काय म्हटलं?

SCROLL FOR NEXT