Bangladesh Vs India ODI History
Bangladesh Vs India ODI History  esakal
क्रीडा

Bangladesh Vs India : बांगलादेश दौरा दिसतो तितका सोपा नाही; ही आहेत त्याची 5 उदाहरणे!

अनिरुद्ध संकपाळ

Bangladesh Vs India ODI History : भारत आणि बांगलादेश तीन वनडे सामन्यांची मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. भारताचा मूळ वनडे संघ या मालिकेत उतरणार आहे. आता तुलनेने बलाढ्य आणि मजबूत संघ न्यूझीलंडविरूद्ध देखील भारताने भारताने आपला युवा संघ उतरवला होता. मात्र बांगलादेश दौऱ्यावर भारताचा मूळ संघ उतरवण्यात येत आहे. जरी बांगलादेश दिसताना दुबळा दिसत असला तरी तो एक झुंजार संघ आहे. याची वनडे क्रिकेट इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. भारताविरूद्धच बांगलादेशने अनेकवेळा चांगली कामगिरी केली होती. आज अशाच भारत - बांगलादेश यांच्यातील स्मरणात राहणारे पाच सामने पाहणार आहोत.

भारताचा 2014 चा बांगलादेश दौरा

या दौऱ्यावरील दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशच्या पदार्पण करणाऱ्या टस्कीन अहदमने 28 धावात 5 विकेट घेत भारताला 105 धावात गुंडाळले होते. सामना इथेच संपला होता, बांगलादेशचा विजय जवळपास निश्चित होता. मात्र स्टुअर्ट बिन्नीने कमाल केली. त्याने 4 धावात 6 विकेट्स घेत बांगलादेशला 17.4 षटकात 58 धावात गुंडाळले. भारताने डकवर्थ लुईसनुसार सामना 47 धावांनी जिंकला.

भारताचा 2002 चा बांगलादेश दौरा

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला अटीतटीचा सामना भारताने 11 धावांनी जिंकला होता. मात्र दुसऱ्या वनडे मध्ये बांगलादेशने या पराभवाचा बदला घेतला. आफताब अहमदच्या 67 धावांच्या जोरावर बांगलादेशने 9 बाद 229 धावा केल्या. त्यानंतर भारताकडून श्रीरामने 57 आणि मोहम्मद कैफच्या 49 धावा केल्या मात्र मशरफी मोर्तझाच्या नेतृत्वात बांगलादेशने भारताचा 15 धावांनी पराभव करत इतिहास रचला. बांगलादेशने यापूर्वी 1999 मध्ये पाकिस्तानला आणि 2004 मध्ये झिम्बाब्वेचा पराभव केला होता. त्यानंतर बांगलादेशकडून पराभूत होणारा भारत तिसरा आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य असलेल्या संघ ठरला.

भारत - बांगलादेश चॅम्पियन्स ट्रॉफी 2017

बांगलादेश 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम 4 संघात पोहचली होती. त्यांचा सेमी फायनलचा सामना भारताविरूद्ध होता. बांगलादेशने दमदार सुरूवात केली. मात्र केदार जाधवने तमिम इक्बाल आणि मुशफिकूर रहीम हे दोन महत्वाचे मोहरे टिपले. यामुळे बांगलादेशला 264 धावात रोखणे शक्य झाले. यानंतर भारताने 87 धावांची सलामी दिली होती. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नाबाद भागीदारी रचत भारताला 9 विकेट राखून दणदणीत विजय मिळवून दिला. रोहित शर्माने नाबाद 123 धावा तर कोहलीने आक्रमक 96 धावांची खेळी केली होती.

2007 चा वनडे वर्ल्डकप बांगलादेशने केला भारताचा पराभव

बांगलादेशने 2007 च्या वर्ल्डकपमध्ये भारताला पराभवाचा धक्का दिला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला बांगलादेशने 191 धावात रोखले होते. सौरभ गांगुलूच्या 66 आणि युवराज सिंगच्या 47 धावांच्या जोरावर भारताने ही धावसंख्या गाठली होती. मात्र बांगलादेशचा सलामीवीर तमिम इक्बालने भारतीच गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. इक्बालनंतर मुशफिकूरने बांगलादेशचा विजय निश्चित केला होता.

2011 वर्ल्डकप

बांगलादेश आणि भारत यांच्यात 2011 मध्ये देखील स्मरणीय सामना झाला होता. या सामन्यात भारताने बांगलादेशविरूद्ध 370 धावांचा डोंगर उभारला होता. विरेंद्र सेहवागने 175 धावांची तडाखेबाज खेळी केली. वर्ल्डकपच्या इतिहासात भारतीय फलंदाजाकडून केली गेलेली ही सर्वात मोठी खेळी होती. विराट कोहलीने देखील 83 चेंडूत 100 धावा करत वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक साजरे केले होते. भारताने हा सामना 87 धावांनी जिंकला होता. भारताकडून मुनाफ पटेलने 48 धावात 4 विकेट्स घेतल्या होत्या.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT