bcci added rinku singh to india a squad for 2nd four day match against england lions cricket news in marathi  sakal
क्रीडा

Ind vs Eng : BCCI ची मोठी घोषणा! इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी रिंकू सिंगची ताफ्यात एन्ट्री

Kiran Mahanavar

India A Squad against England Lions : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पण याआधी या दोन देशांच्या अ संघांमध्ये तीन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका सुरू झाली आहे, त्यातील पहिला सामना अहमदाबादमध्ये 17 ते 20 जानेवारी दरम्यान खेळला गेला.

या मालिकेपूर्वी, बीसीसीआयने केवळ दोन दिवसीय सराव आणि पहिल्या अनधिकृत सामन्यासाठी भारत अ संघाची घोषणा केली होती, तर 19 जानेवारी रोजी शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला होता. त्यावेळी रिंकू सिंगची तिसर्‍या सामन्यासाठी निवड झाली असली तरी आता दुसऱ्या सामन्यासाठीही त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने 23 जानेवारी रोजी इंग्लंड लायन्स विरुद्ध दुस-या चार दिवसीय सामन्यासाठी रिंकू सिंगचा संघात समावेश करण्याची घोषणा केली. रिंकू सिंगला आयपीएल 2023 मधील त्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताच्या टी-20 संघात स्थान मिळाले आणि त्यानंतर त्याचा ODI संघातही समावेश करण्यात आला.

त्याला सर्वात लहान फॉरमॅटमध्येच अधिक संधी मिळाल्या, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. रिंकूने 15 सामन्यात 89 च्या जबरदस्त सरासरीने 356 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राईक रेट 176.23 आहे आणि त्याने आपल्या बॅटने दोन अर्धशतकही झळकावले आहेत.

या डावखुऱ्या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ टी-20 फॉरमॅटमध्येच आपला ठसा उमटवला नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने उत्तर प्रदेशसाठी लाल चेंडूवर भरपूर धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रिंकूने 44 सामन्यांमध्ये 57 पेक्षा जास्त सरासरीने 3109 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 7 शतके आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे.

इंग्लंड लायन्सविरुद्धच्या या दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून त्याला कसोटी संघात स्थान मिळवण्याची संधी असेल.

इंग्लंड लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी भारत अ संघ - अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, व्ही कविरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल, रिंकू सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT