bcci announces increase monthly pensions of former cricketers and umpires  
क्रीडा

BCCI ची मोठी घोषणा, माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली.

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंचांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट करून माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सुमारे 900 खेळाडू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे.(bcci announces increase monthly pensions of former cricketers and umpires)

BCCI सचिव जय शहा यांनी ट्विट केले की, माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. 900 क्रिकेटपटू आणि पंचांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे जवळपास ७५ टक्के खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या पेन्शनमध्ये १०० टक्के वाढ होईल.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, आम्ही आमच्या माजी खेळाडूंच्या आर्थिक स्थितीची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. खेळाडू ही मंडळाची जीवनरेखा आहेत. निवृत्तीनंतर त्यांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य आहे. पंच हे अनसिंग हिरो आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या योगदानाची खरोखर कदर करते.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण सिंग धुमाळ म्हणाले, बीसीसीआय आज जे काही आहे ते तिच्या माजी खेळाडू आणि पंचांमुळे आहे. वाढीव पेन्शन जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे.

या घोषणेनंतर बीसीसीआयच्या माजी सदस्यांचे पेन्शन जे 15 हजार रुपये मिळत होते ते आता 30,000 हजार रुपये प्रति मिळणार महिना आहेत. ज्यांना 22 हजार 500 रुपये मिळतात त्यांना 45 हजार रुपये मासिक मिळणार आहेत. ज्यांना 30,000 रुपये मिळतात त्यांना आता 52,500 रुपये मिळतील. 37,500 रुपये असलेल्यांना 60,000 रुपये मासिक दिले जातील. ज्यांची पेन्शन 50,000 रुपये आहे, त्यांना आता दरमहा 70,000 रुपये मिळणार आहेत. ही घोषणा जून २०२२ पासून लागू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT