क्रीडा

WPL चे वेळापत्रक ठरले पहिल्याच सामन्यात अदानी-अंबानी भिडणार

वुमन्स प्रीमियर लीग 2023 चा ऐतिहासिक लिलाव 13 फेब्रुवारीला पार पडला

सकाळ डिजिटल टीम

वुमन्स प्रीमियर लीग 2023 चा ऐतिहासिक लिलाव 13 फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक भारतीय महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. दरम्यान, लीगचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. पहिला सामना गुजरात विरुद्ध मुंबई असा रंगणार आहे.

महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स हे संघ रिंगणात असणार आहेत.

ही स्पर्धा ४ मार्चपासून सुरू होणार असून २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. एकूण पाच संघ 22 सामने खेळणार आहेत. सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियमवर खेळवले जातील.

23 दिवसांत साखळी फेरीत 20 सामने खेळवले जातील. याशिवाय एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळवला जाईल. पहिला सामना गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.

त्याचबरोबर साखळी फेरीदरम्यान चार डबल हेडर सामने खेळवले जातील. म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळवले जातील.

पहिला सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, तर दुसरा सामना 7.30 वाजता सुरू होईल.

लीग टप्प्यातील शेवटचा सामना 21 मार्च रोजी यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तर, एकमेव एलिमिनेटर 24 मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर आणि अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाईल.

WPLच्या पहिल्या हंगामासाठी ५ संघ

दिल्ली कॅपिलट्सचा

मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरीस, जेसिया अख्तर, मॅरिझन्ने कॅप, शिखा पांडे, राधा यादव, मिन्नू मनी, तितास साधू, तारा नॉरिस, एलिसे कॅप्स, जेस जॉनासेन, स्नेह दीप्ती, अरुंधती रेड्डी, अपर्णा मोंडला, पूनम यादव, तानिया भाटीया

यूपी वॉरियर्स

दीप्ती शर्मा, एस यशश्री, सोफी एक्लेस्टन, लक्ष्मी यादव, ताहलिया मॅग्राथ, देविका वैद्य, शबनिम इस्मैल, ग्रेस हॅरीस, एलिसा हिली, लॉरेन बेल, अंजली सर्वणी, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, सिमरन शेख, पार्श्नवी चोप्रा.

गुजरात जायंट्स

ॲश्ली गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलथा, मानसी जोशी, ॲनाबेल सदरलँड, मोनिका पटेल, डिएंड्रा डॉटीन, सबिनेनी मेघना, सोफीया डंक्ली, सुष्मा वर्मा, हर्लीन देओल, हर्ली गाला, स्नेह राणा, अश्विनी कुमारी, जॉर्जिया वरेहम, परुणिका शिसोदिया, तनुजा कनवर, शबमन शकिल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्मृती मानधना, एलिसे पेरी, सोफी डिव्हाईन, रेणुका सिंग, रिचा घोष, एरिन बर्न्स, दीशा कसत, श्रेयंका पाटील, कनिका, ए शोबना, इंद्रानी रॉय, हिदर नाईट, डॅन व्हॅन निएकर्क, प्रीती बोस, पूनम खेमनार, कोमल झांझड, मीगन शुट, सहाना पवार.

मुंबई इंडियन्सचा संघ

हरमनप्रीत कौर, नॅट शिव्हर, एमिलिया केर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीदर ग्रॅहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, धारा गुजर, सायका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लो ट्रायॉन, हुमैरा काझी, प्रियांका बाला, सोनम यादव, जिंतिमणी कलित, नीलम बिष्ट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT