Team India
Team India Sakal
क्रीडा

SA VS IND : रोहित आउट; KL राहुल बनला कॅप्टन; असा आहे वनडे संघ

सुशांत जाधव

दुखापतीमुळे कसोटी पाठोपाठ रोहित शर्माला वनडे मालिकेलाही मुकावे लागणार

India Tour Of South Africa, BCCI announces Team India : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे कसोटी पाठोपाठ रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे मालिकेलाही मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुभस्थितीत लोकेश राहुलकडे (KL Rahul) भारतीय संघाची धूरा देण्यात आली आहे. बीसीसीआयने नुकतीच यासंदर्भात घोषणा केली. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वीत मोठा धक्का बसला होता.

रोहित शर्माला स्नायूच्या दुखापतीमुळे कसोटीतून माघार घेण्याची वेळ आली. त्यानंतर तो वनडे खेळणार की नाही यासंदर्भात संभ्रम होता. त्याच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह असल्यामुळे बीसीसीआय वनडे संघ निवडीसाठी वेळ घेत असल्याच्या बातम्या आल्या. अखेर रोहित शर्मा फिट नसून त्याच्याशिवायच भारतीय संघ वनडे मालिकेसाठी मैदानात उतरणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात शिखर धवनला संधी देण्यात आली आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर पुन्हा एकदा तो टीम इंडियात दिसणार आहे. त्याच्याशिवाय ऋतूराज गायकवाड आणि व्यंकटेश अय्यर या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल, आर अश्विन, आणि वाशिंग्टन सुंदर या तिघांचा संघात समावेश असून जलदगती गोलंदाजीची धूरा ही अनुभवी भुवनेश्वर कुमारसह प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. बुमराहकडे उपकर्णधारपदाच्या जबाबदारीशिवाय संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असेल.

भारतीय संघ : लोकेश राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतूराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, वाशिंग्टन सुंदर, जसप्रित बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT