bcci-central-contracts jasprit-bumrah-remained-a-catagory-fans-slams-board-of-control-for-cricket-in-india cricket news in marathi
bcci-central-contracts jasprit-bumrah-remained-a-catagory-fans-slams-board-of-control-for-cricket-in-india cricket news in marathi  
क्रीडा

Team India : भाऊ चालले तरी काय... सहा महिने झाले बुमराह खेळला नाही तरी A+ ग्रेडमध्ये, BCCI झोपेत...

Kiran Mahanavar

BCCI Central Contracts 2022-23 Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2022-23 हंगामासाठी वार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह A+ श्रेणीत आहे.

दुखापतीमुळे जवळपास 6 महिन्यांपासून बुमराह क्रिकेटपासून दूर आहे. BCCI A+ श्रेणीतील खेळाडूंना पगार म्हणून वार्षिक 7 कोटी देते. त्यामुळे सोशल मीडियावर लोक म्हणतात की बुमराहला 7 कोटी रुपये का मिळत आहेत हे समजत नाही. लोकांचे म्हणणे आहे की जो खेळाडू दुखापतीमुळे बहुतेक वेळा टीम इंडियाच्या बाहेर राहतो, त्याला एवढा मोठा पगार का दिला जात आहे.

जसप्रीत बुमराहने 25 सप्टेंबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 म्हणून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो दुखापतीमुळे बाहेर आहे. बुमराहला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये काढायला हवे होते, असे लोकांचे म्हणणे आहे. ए+ श्रेणीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमीचा समावेश करण्याची मागणी अनेकजण करत आहेत.

पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराहने गेल्या काही वर्षांत अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकला आहे. पाठीच्या समस्येमुळे त्याला टी-20 विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले. त्याला नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधूनही बाहेर पडावे लागले.

जसप्रीत बुमराह आगामी आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही. आयपीएलची 16 वी आवृत्ती 31 मार्चपासून सुरू होणार आहे. विक्रमी 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून तो खेळणार नाही. एका यूजरने लिहिले, 'आणि सर्व ठीक आहे पण बुमराह A+ मध्ये कशासाठी?

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा A+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे तर हार्दिक पंड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांचा A+ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: पहिल्या वादळी पावसामुळे रेल्वे वाहतुकीचे तीन तेरा; मुंबईकरांचे दिवसभर अतोनात हाल!

लोकशाहीसाठी राज्यभर राबवली 'निर्भय बनो' मोहिम; पण विश्वंभर चौधरी स्वतः मतदानापासून राहिले वंचित; कारण काय?

GT vs KKR Live Score IPL 2024 : पावसाचा जोर कायम, गुजरात - केकेआर सामन्यावर संकट

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT