Kl Rahul sakal
क्रीडा

केएल राहुलचे कमबॅक; झिम्बाब्वे दौऱ्यात करणार भारताचं नेतृत्व

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून झिम्बाब्वे दौऱ्यात तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वैद्यकीय पथकाने केएल राहुलची तंदुरुस्ती तपासून त्याला भारतीय संघातील समावेशाला मंजुरी दिली आहे. (BCCI clears KL Rahul for Zimbabwe tour)

भारतीय वरिष्ठ निवड समितीने राहुलला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. तर शिखर धवनला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

यापूर्वी शिखर धवन झिम्बाब्वे दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करणार होता. पण केएल राहुल तंदुरुस्त झाल्यामुळे धवनला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यापूर्वी 30 जुलै रोजी तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दौऱ्यासाठी विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

दरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राहुल त्रिपाठीला २०२२ च्या हंगामात चांगली कामगिरी केल्यामुळे एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले आहे. 14 सामन्यांत त्याने 37.55 च्या सरासरीने 413 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतके ठोकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd Test: भारताविरुद्ध मुथूसामीचं पहिलं शतक, तर यान्सिनचीही वादळी खेळी; द. आफ्रिकेची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

Nashik News : नाशिकमध्ये कडाक्याची थंडी: विद्यार्थ्यांसाठी दिलासा; शाळा एक तास उशिरा भरणार?

Hingoli Bank Account Scam: दहा हजारांसाठी बॅंक खाते भाडेतत्त्वावर ऑनलाइन बेटिंगसाठी वापर, हिंगोलीत सहा महिन्यांपासून गोरखधंदा

Gondia Crime: मुलींवर अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना; घाटबोरीतील मुख्याध्यापकाला अटक, नवेगावबांध येथील घटनेत शिक्षक फरार

Manmad-Indore Rail project : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला ब्रेक! रेल्वे मंत्रालयाच्या विलंबामुळे भूसंपादन प्रक्रिया लांबणीवर

SCROLL FOR NEXT