Roger Binny Mayanti Langer Conflict of Interest Notice  esakal
क्रीडा

Roger Binny : हितसंबंध; सुनेमुळे नवे बीसीसीआय अध्यक्ष अडचणीत?

अनिरुद्ध संकपाळ

Roger Binny Mayanti Langer Conflict of Interest Notice : बीसीसीआयचे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना देखील हितसंबंधांच्या वादासंदर्भात नोटिस मिळाली आहे. बीसीसीआयचे नैतिक अधिकारी (Ethics Officer) विनीत सरन यांनी ही नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली असून. बिन्नी यांना सरन यांच्याकडो 20 दिवसात या नोटिशीबाबत उत्तर द्यावे लागणार आहे. तक्रारदार संजीव गुप्ता यांनी बिन्नी यांची सून मयंती लँगर - बिन्नी ही स्टार स्पोर्ट्ससाठी काम करते यावरून ही तक्रार केली आहे.

बीसीसीआय नैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या या नोटिसीमध्ये बीसीसीआयचे नैतिक अधिकारी म्हणातात की 'तुम्हाला कळवण्यात येत आहे की आम्हाला नियम 39(2) ब अंतर्ग तुमच्याविरूद्ध तक्रार मिळाली आहे. तुमच्यावर नियम 38(1) आणि 38(2) अंतर्गत हितसंबंधाबाबतचा नियम (Conflict of Interest) भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तुम्हाला आदेश देण्यात येत आहेत की, तुम्ही या तक्रारीबाबत तुमचे लिखीत उत्तर दिनांक 20 - 12 - 2022 पर्यंत द्यावे. तुमच्या लिखीत उत्तरासोबत प्रतिज्ञापत्रही जोडावे.'

रॉजर बिन्नी हे भारताने पहिल्यांदा 1983 साली जिंकलेल्या वर्ल्डकप संघातील सदस्य आहेत. त्यांनी बीसीसीआयचे 36 वे अध्यक्ष म्हणून ऑक्टोबरमध्ये कार्यभार स्विकारला आहे. त्यांनी सौरभ गांगुलीची जागा घेतली. 67 वर्षांच्या बिन्नींनी भारताकडून 27 कसोटी सामने खेळेले आहेत. दरम्यान, मयंती लँगर ही रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी याची पत्नी आहे. ती सध्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा स्टार स्पोर्ट्सवर अँकर म्हणून सक्रीय झाली आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT