Indias ODI World Cup 2023 Squad Final 
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ फायनल; KL राहूलबाबत घेतला मोठा निर्णय

Kiran Mahanavar

Indias ODI World Cup 2023 Squad Final : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCI ने भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाचा कागदपत्री संघ फायनल केला आहे. शनिवारी कँडी येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर वरिष्ठ निवड समितीची बैठक झाली, ज्यामध्ये वर्ल्ड कप संघाची निवड करण्यात आली.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, दुखापतीशी झगडत असलेल्या केएल राहुलला या संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. तर संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही. दुसरा यष्टिरक्षक म्हणून इशान किशनचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर श्रीलंकेला गेले होते आणि कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत त्यांनी शनिवारी रात्री उशिरा वर्ल्डसाठी भारतीय संघाची निवड केली. कँडी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यानंतर ही बैठक झाली.

संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्याशिवाय दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज कृष्णा, जो सध्या आशिया कपसाठी श्रीलंकेत आहे, हे देखील संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. बॅकअप यष्टिरक्षक म्हणून इशान किशनलाही स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय फलंदाजीचे नेतृत्व करतील.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, निवड समितीने राहुलच्या फिटनेसवरही चर्चा केली आणि वैद्यकीय संघाच्या ग्रीन सिग्नलनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. राहुल बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये अनेक तास नेटमध्ये सराव करत आहे. आशिया कप स्पर्धेत भारतीय संघात सामील होण्यासाठी त्याला श्रीलंकेला पाठवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) अंतिम वर्ल्ड संघ सादर करण्यासाठी बीसीसीआयला 5 सप्टेंबरची अंतिम मुदत असताना, त्यांना 4 सप्टेंबरच्या संध्याकाळी निवड समितीची बैठक घ्यायची होती. पण वैद्यकीय पथकाने केएल राहुलला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर बीसीसीआयने एक दिवस थांबण्याऐवजी संघाची निवड केली. वर्ल्ड कप दरम्यान केएल राहुल विकेटकीपिंग करणार आहे. उजव्या मांडीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुल तब्बल ४ महिने संघापासून दूर होता.

अहवालानुसार 15 सदस्यीय टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT