IND vs SL BCCI Jay Shah  esakal
क्रीडा

IND vs SL BCCI : पर्यावरणाला धोका! जय शहा अन् बीसीसीआयने वानखेडेवरील भारत - श्रीलंका सामन्यासाठी घेतला मोठा निर्णय

अनिरुद्ध संकपाळ

IND vs SL BCCI : भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या वर्ल्डकप 2023 च्या सामन्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रदुषणाचा विचार करता वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर फटाक्यांच्या आतशबाजी करण्यात येणार नाहीये. मुंबईतील सामन्यात आकाशात कोणतीही आतशबाजी होणार नाही.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या विषयी आयसीसीशी अधिकृतरित्या चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील सामन्यात फटाक्यांची आतशबाजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जय शहा यांनी सांगितलं की, 'बीसीसीआय हे पर्यावरणाविषयी सजग आहे. मी हा विषय आसीसीसमोर अधिकृतरित्या मांडला आणि सांगितले की मुंबईत कोणतीही आतशबाजी होणार नाही. यामुळे प्रदुषणात वाढ होऊ शकते. क्रिकेट बोर्ड हे पर्यावरणाविषयीच्या लढ्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही आमचे चाहते आणि भागधारकांना सर्वोच्च प्राधान्य देतो.'

चाहते जय शहा अन् बीसीसीआयवर झाले नाराज

जय शहा यांनी या निर्णयाची घोषणा करताच चाहते शहा आणि बीसीसीआयवर नाराज झाले. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हिंदूंचा प्रसिद्ध सण दिवळी अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बीसीसीआयचा हा निर्णय लोकं त्याच्याशी जोडून पाहत आहेत.

एका युजरने एक्सवर (ट्विटरवर) लिहिले की, 'नवीन वर्षाला आणि 4 जुलैच्या सेलिब्रेशनवेळी पाश्चिमात्य देशाबाबत देखील असाच पर्यावरणाचा कळवळा दाखवता का की फक्त भारताला एक निरस ठिकाण बनवून भारतीयांना फटाक्यांची आतशबाजीचा आनंद घेण्यासाठी विदेशात जाण्यासाठी भाग पाडताय?

दुसऱ्या एक्स युजरने प्रतिक्रिया दिली की, 'तुम्ही या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. दिवळीत ज्ञान पाजळण्याची आतापासून तयारी होत आहे.'

भारतीय संघ वानखेडेत श्रीलंकेचा पराभव करून अधिकृतरित्या वर्ल्डकप सेमी फायनलचं तिकीट निश्चित करण्यासाठी उत्सुक असणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT