BCCI Male Female Equal Match Fee Announcement Chandu Borde Congratulate Jay Shah  esakal
क्रीडा

BCCI Gender Equality : चंदू बोर्डेनीं केलं जय शहांचे अभिनंदन; मोठं दिवाळी गिफ्ट मिळालं

अनिरुद्ध संकपाळ

BCCI Male Female Equal Match Fee Announcement : बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आपल्या दुसऱ्या टर्मची सुरूवात धडाकेबाज पद्धतीने केली. त्यांनी भारत आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाही असे ठणकावून सांगितल्यानंतर काही दिवसात ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. बीसीसीआय इथून पुढे पुरूष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मॅच फी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अनेक दिवसांपासून महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंच्या मानधनातील तफावत या विषयावर लिहिले बोलले जात होते. आता बीसीसीआयने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन स्त्री पुरूष समानतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. या निर्णयानंतर 'सकाळ'ने भारताचे माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्याशी संवाद साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

चंदू बोर्डेंनी बीसीसीआयच्या या निर्णयावर मनस्वी आनंद व्यक्त करताना यामुळे महिला क्रिकेट बदलणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, 'हा निर्णय फक्त महिला क्रिकेटच नाही तर संपूर्ण क्रिकेट विश्व बदलून टाकणारा आहे. यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटला प्रोत्साहन मिळणार आहे. क्रीडा संस्कृती वाढण्याच्या दृष्टीकोणातून हा निर्णय खूप महत्वाचा ठरणार आहे. या निर्णयासाठी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.'

बोर्डे पुढे म्हणाले की, 'इतकं चांगलं दिवळीचं गिफ्ट आतापर्यंत कोणाला मिळालं की नाही माहिती नाही. मात्र बीसीसीआयने फार सुरेख गिफ्ट दिलं आहे. खेळ आता जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. इतर क्षेत्रातही महिला आता इतक्या मोठ्या प्रमाणावर पुढे जात आहेत. आता या निर्णयामुळे भारतातील एकूण क्रीडा क्षेत्राचा स्तर सुधारणार आहे.'

चंदू बोर्डेंना भारतीय संघाने गेल्या काही वर्षात वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्याचा परिणाम हा निर्णय घेताना झाला असेल का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी, 'या कामगिरीमुळे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला असेल. महिला संघाने आशिया कप जिंकल्यामुळे त्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. बोर्डाकडे चांगला पैसा आहे. मात्र बोर्ड या पैशाचा चांगला वापर करतंय असं मला वाटतं. आता खेळाडू अधिक मेहनत करतील.'

भारतातील महिला खेळाडूंबाबत त्यांच्या पालकांचा आणि समाजाच्या दृष्टीकोणावरही बोर्डे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'आधी काय हे महिला क्रिकेट असा दृष्टीकोण असायचा. मात्र आताच्या भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू ज्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहेत. झोकून देऊन क्षेत्ररक्षण करतात, फटकेबाजी करत आहेत. ते कौतुक करण्यासारखं आहे. फक्त भारतीय महिला क्रिकेटपटूंचा स्तर सुधारलेला नाही तर एकंदर जागतिक क्रिकेटमधील सर्व महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचा स्तर उंचावला आहे.'

'बीसीसीआयच्या समान मानधन देण्याच्या निर्णयानंतर महिला क्रिकेटपटूंची जबाबदारी वाढणार आहे. मात्र या जबाबदारी वाढण्याने त्यांचीच प्रगती होणार आहे. आता मुलींचे पालक देखील या निर्णयामुळे त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीकोणातून पाहतील आणि त्यांना क्रिकेट खेळायला अधिक प्रोत्साहन मिळेल असे मला वाटते.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT