India vs Pakistan Asia Cup  2023
India vs Pakistan Asia Cup 2023 esakal
क्रीडा

Asia Cup 2023 India Vs Pakistan : ...तर भारत आशिया कप 2023 वर टाकणार बहिष्कार?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 India Boycott : पाकिस्तानला आशिया कप पाकिस्तानातच खेळवण्याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. पीसीबी चेअरमन नजम सेठी यांनी एशियन क्रिकेट काऊन्सिलला एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाला बांगलादेश आणि श्रीलंका पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष जय शहा या प्रस्तावावर दोन दिवस चाचपणी करून निर्णय घेणार आहेत. मात्र बीसीसीआयने जर आशिया कप पाकिस्तान सोडून दुसऱ्या ठिकणी हलवण्यात आला नाही तर त्यावर बहिष्कार घालण्याबाबत ठाम आहे.

काय आहे पाकिस्तानचा प्रस्ताव?

प्रस्ताव 1 - पाकिस्तान आशिया कप पाकिस्तानात आयोजित करेल. भारत त्यांचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळले.

प्रस्ताव 2 - स्पर्धा दोन भागात विभागली जावी. पाकिस्तानात स्पर्धेची पहिली फेरी आयोजित केली जाईल. दुसऱ्या फेजमध्ये भारत आपले सर्व सामने त्रयस्थ ठिकाणी खेळले. फायनल देखील त्रयस्थ ठिकाणी होईल.

याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, 'आम्ही अजून प्रस्ताव पाहिलेला नाही. मात्र आम्ही आमच्या भुमिकेत बदल केलेला नाही. आम्ही स्पर्धा त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याबाबत ठाम आहोत आणि स्पर्धा युएईमध्येही खेळवण्यात येणार नाही. कारण तेथील उष्णतेमुळे अजून दुखापतींचा धोका आम्ही पत्करू शकत नाही. श्रीलंका आशिया कप आयोजित करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. सध्या तरी आम्ही स्पर्धेवर बहिष्कार घालण्याबाबत चर्चा केलेली नाही. आधी परिस्थिती समजून घेतली जाईल त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल.'

बीसीसीआयने पाकिस्तानचे हायब्रीड मॉडेल आधीच नाकारले आहे. बीसीसीआयने संपूर्ण स्पर्धाच त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. याचबरोबर पाकिस्तानने श्रीलंकेला द्विपक्षीय कसोटी मालिका रद्द करण्याची धमकी दिली आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT