BCCI may send Wriddhiman Saha show cause notice  esakal
क्रीडा

दादाशी पंगा साहाला पडणार महागात; BCCI कारवाईच्या विचारात?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भारताचा विकेटकिपर वृद्धीमान साहाने (Wriddhiman Saha) श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळल्यानंतर बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरभ गांगुली (Sourav Ganguly), प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि निवडसमिती अध्यक्ष असा तिघांविरूद्ध मोर्चा उघडला होता. वृद्धीमान साहाने सौरभ गांगुलीने जोपर्यंत तो पदावर आहे तोपर्यंत साहाच्या स्थानाला धोका नाही असे वैयक्तिक चॅटमध्ये सांगितले होते. हे चॅट साहाने उघड केले. त्याने द्रविड आणि चेतन शर्मा यांच्याबरोबरचा संवाद देखील सार्वजनिक केला होता. आता हे प्रकरण सहाला जड जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय वृद्धीमान साहाला क्रेंद्रीय कराराचा भंग (Violation of Central Contract) केल्याप्रकरणी कारणे दाखवला नोटिस बजावण्याची शक्यता आहे.

भारतीय संघातील खेळाडू हे बीसीसीआयशी केंद्रीय करार (BCCI Central Contract) करत असतात. वृद्धीमान साहाचा ग्रुप ब मध्ये समावेश आहे. त्याला वर्षाला 3 कोटी रूपये मानधन मिळते. या करारात एक 6.3 कलम आहे या कलमाचे उल्लंघन वृद्धीमान साहाने केले असल्याचा दावा केला जात आहे.

बीसीसीआय खेळाडूंकडून ज्या करारावर स्वाक्षऱ्या करून घेते त्या करारातील कलम 6.3 सांगिते की, ' खेळाडूंनी खेळ, अधिकारी, खेळात घडलेल्या घटना, वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, निवडीबाबतचे विषय किंवा खेळासंदर्भातील इतर विषय याबबात खेळाच्या हिताला, संघाला किंवा बीसीसीआयला बाधा पोहचवणारी कोणतेही वक्तव्य कोणत्याही माध्यमात करू नये.'

वृद्धीमान साहाने नुकतीच केलेली वक्तव्ये ही निवडीबाबत, तसेच प्रशिक्षक राहुल द्रविड, निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांच्याशी झालेला वैयक्तिक संवादाबाबत होती. याबाबत बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी अरूण धुमल (Arun Dhumal) यांनी पीटीआयला माहिती दिली. ते म्हणाले 'हो बीसीसीआय वृद्धीमान साहाला निवडीबाबतचा विषय तू करारात असताना कसा काय बोललास हे विचारू शकते. बसीसीआय अध्यक्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते त्याला प्रोत्साहित करत होते. द्रविडबरोबर ड्रेसिंग रूमधील संवाद साहाने सार्वजनिक का केला हे बोर्डाला जाणून घेणे गरजेचे वाटू शकते.'

आता या प्रकरणात वृद्धीमान साहाला बीसीसीआय कराणे दाखवा नोटिस (Showcause Notice) बजावणार का असे विचरले असता. धुमल म्हणाले की, 'या प्रकरणावर आम्ही अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सध्या सर्वजण गडबडीत आहोत. आम्ही याबाबत काही दिवसातच निर्णय घेऊ.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT