bcci meeting big udpate rohit sharma captaincy and rahul dravid coaching cricket news  sakal
क्रीडा

Team India: रोहित शर्माच्या कर्णधारपदाला धोका, राहुल द्रविडच काय...

हार्दिकडे टी-20 चे नेतृत्व?

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली, ता. २० ः बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या उद्या होणाऱ्या बैठकीत खेळाडूंचा मानधन करार, नवी निवड समितीला मंजुरी आदी विषय असले तरी भविष्याच्या दृष्टीने वेगवेगळे कर्णधार आणि प्रशिक्षक नेमायचे का, या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे.

ही बैठक ऑनलाईन होत आहे. त्यात बीसीसीआयचे सर्व प्रमुख अधिकारी सहभागी असतील. संघाबाबत निवड समिती निर्णय घेत असली तरी तिन्ही प्रकारांत काही खेळाडू सातत्याने खेळत असल्यामुळे त्यांच्यावर येणारा ताण लक्षात घेता वेगवेगळा संघ आणि कर्णधार तसेच प्रशिक्षकांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी मंजुरी दिली तर या मुद्द्यावर चर्चा होऊ शकेल.

या बैठकीसाठी विविध अजेंडा आहेत, परंतु ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा कोणताही मुद्दा पटलावर नाही. परंतु बिन्नी यांनी ठरवले तर यावर चर्चा अपेक्षित आहे. पुढच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेला दोन वर्षे आहेत, परंतु पुढच्या वर्षी आपल्या देशात ५०-५० षटकांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

हार्दिकडे टी-20 चे नेतृत्व?

आता तिन्ही प्रकारांत भारताचे नेतृत्व करत असलेला रोहित शर्मा एप्रिल महिन्यात ३६ वर्षांचा होईल. टी-२० कर्णधारपदासाठी हे वय अधिक असू शकेल. आता तातडीने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा विचार करण्याची वेळ नसली, तरी भविष्याची तयारी आतापासून केली जाऊ शकते, त्यामुळे भारतात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकांसाठी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. त्याचप्रमाणे प्रशिक्षक पदातही बदल होऊ शकतो, असेही हा पदाधिकारी म्हणाला.

बैठकीसाठीचे काही अजेंडा

  • खेळाडूंची मानधन योजना, कोणाला बढती देणार कोणाला करारातून वगळणार.

  • नव्या निवड समितीला मान्यता

  • जर्सी प्रायोजकांबाबत निर्णय

  • इन्फ्रास्ट्रक्टर उपसमितीची नियुक्ती

  • ऑस्ट्रेलियाविरुद्धची अहमदाबाद येथे होणारी कसोटी प्रकाशझोतात खेळण्याबाबत

  • भारतीय संघातील क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलीप आणि फिजिओ टीम बदलण्याबाबत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT