Asia Cup 2023 BCCI esakal
क्रीडा

Asia Cup 2023 : ठरलं तर मग! बीसीसीआयचे अधिकारी जाणार पाकिस्तानला, जय शहा...

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे निमंत्रण स्विकारले आहे. हे दोघे चार ते सात डिसेंबरदरम्यान लाहोरमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या काही सामन्यात आपली उपस्थिती दर्शवणार आहेत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पाकिस्तानमधील सामने पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी हे निमंत्रण स्विकारले आहे.

पाकिस्तानमध्ये 30 ऑगस्टला मुल्तान मध्ये आशिया कपची सुरूवात होणार आहे. पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला आणि सचिव जय शहा 2 सप्टेंबरला कँडी येथील भारत आणि पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी श्रीलंकेत असणार आहेत. हे तिघेही या सामन्यानंतर भारतात परततील आणि त्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे अटारी - वाघा बॉर्डरद्वारे लाहोरमध्ये प्रवेश करतील.'

रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला हे दोघेही आपापल्या पत्नीसोबत 4 सप्टेंबरला लाहोरमध्ये पीसीबी गवर्नर हाऊस यांनी आयोजित डीनरमध्ये देखील सामील होतील. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही अधिकारी 5 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका आणि सहा सप्टेंबरला होणाऱ्या पाकिस्तानच्या सुपर 4 मधील पहिल्या सामन्याला देखील उपस्थिती दर्शवतील.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला यांनी 2004 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT