Sourav Ganguly On Virat Kohli
Sourav Ganguly On Virat Kohli sakal
क्रीडा

Asia Cupपूर्वी गांगुलीचे कोहलीवर मोठे वक्तव्य; ऐकून चाहत्यांना बसेल धक्का

Kiran Mahanavar

Sourav Ganguly On Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीनंतर त्याने एकही शतक झळकावलेले नाही. अशा परिस्थितीत आशिया चषकाच्या माध्यमातून तो आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. त्याआधी बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी त्यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

भारताचा सुपरस्टार खेळाडू विराट कोहली आशिया कपमध्ये भारतीय संघाचा भाग आहे. आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. आशिया चषकापूर्वी सौरव गांगुली कोहलीला म्हणाला, 'त्याला सराव करू द्या आणि सामना खेळू द्या. तो मोठा खेळाडू आहे आणि त्याने खूप धावा केल्या आहेत. मला आशा आहे की तो परत येईल. त्याला शतक झळकावता आलेले नाही आणि मला खात्री आहे की तो आशिया चषकात त्याचा फॉर्म शोधेल.

आशिया कप 2022 मध्ये विराट कोहली लय शोधू शकतो. आशिया कपमध्ये त्याने नेहमीच सर्वोत्तम खेळ दाखवला आहे. आशिया चषकात फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या नावावर आहे. 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने 183 धावांची इनिंग खेळली होती.

विराट कोहलीला निवड समितीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती दिली होती, त्यानंतर त्याने स्वतः झिम्बाब्वे दौऱ्यातून विश्रांती मागितली. त्याचवेळी इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली चांगलाच फ्लॉप झाला होता. एकमेव कसोटी सामन्यात त्याने 11 आणि 20 धावा केल्या. T20 सामन्यांमध्येही तो चमत्कार दाखवू शकला नाही, जिथे त्याने दोन डावात केवळ 12 धावा केल्या. आयपीएल 2022 मध्ये विराट कोहली चांगली कामगिरी करू शकला नाही. आयपीएल 2022 च्या 16 सामन्यांमध्ये 22.73 च्या सरासरीने केवळ 341 धावा करू शकला, त्याचा स्ट्राइक रेटही दिवसेंदिवस घसरत आहे. कोहलीला टीम इंडियात स्थान मिळण्यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

IPL 2024: क्वालिफायर अन् फायनल स्टेडियममध्ये जाऊन पाहायचेत? कसे आणि कधी करणार तिकीट बूक, जाणून घ्या

Bhavesh Bhinde: रिक्षा चालकाचा मुलगा कसा बनला होर्डिंगसम्राट? भावेश भिंडेवर बलात्काराचे देखील आरोप

Marathi News Live Update: रल्वेच्या हद्दीतील तीन अनधिकृत होर्डिंग काढायला सुरुवात

SCROLL FOR NEXT