BCCI Really Like PAK Journalist Cowardly Tweet sakal
क्रीडा

BCCI ने एक ट्विट काय लाईक केलं पाकिस्तानी पत्रकाराने आकाश पाताळ एक केलं

जय शाह यांच्या वक्तव्यावर पाकिस्तानी पत्रकाराने केले ट्विट, बीसीसीआयला आवडले?

Kiran Mahanavar

BCCI Really Like PAK Journalist Cowardly Tweet : क्रिकेट विश्वात चाहत्यांना नेहमीच भारत आणि पाकिस्तान सामन्यांची प्रतीक्षा असते. मात्र दोन्ही संघांनी गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. एकमेकांच्या देशांनाही भेट दिली नाही. पण पुढच्या वर्षी भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार का यावरून आता गदारोळ सुरू झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार नाही. मग काय या विधानावरून चांगलाच गदारोळ झाला. पीसीबी संतप्त झाले आणि पुढच्याच वर्षी भारताने आयोजित केल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याची धमकी दिली.

पाकिस्तानी पत्रकारांनीही यावर अनेक कमेंट केल्या. यातील एक पत्रकार सय्यद समर अब्बास यांनी जय शाह यांच्या वक्तव्यावर ट्विट करत 'कायर भागो नहीं. खेल को राजनीति से अलग रखें. असे म्हटले आहे. यात मोठी गोष्ट म्हणजे बीसीसीआयनेही हे ट्विट लाईक केले आहे. असा दावाही समर अब्बास यांनी केला आहे. समर अब्बासनेही त्याचे ट्विट बीसीसीआयला टॅग केले. हे ट्विट बीसीसीआयलाही आवडले असल्याचा दावा समरने केला आहे. त्याचा स्क्रीनशॉटही समरने स्वत: शेअर केला आणि बीसीसीआयचे आभारही मानले. त्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

16 ऑक्‍टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्या पात्रता सामने खेळले जात आहेत. टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना खेळवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT