IPL Title Sponsorship  esakal
क्रीडा

Vivoने पळ काढला, TATA आता आयपीएलचे टायटल स्पॉन्सर

अनिरुद्ध संकपाळ

नवी दिल्ली : आयपीएल टायटल स्पॉन्सर विवोने (Vivo) आपली स्पॉन्सरशिप मागे घेतली आहे. त्यामुळे बीसीसीआयने (BCCI) आयपीएलचे टायटल स्पॉन्सर (IPL title sponsor) म्हणून टाटाची निवड केली आहे. हा निर्णय आयपीएलचे गव्हर्निंग काऊन्सीलने आज घेतला.आयपीएलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी 'विवोने आपली टायटल स्पॉन्सरशिप सोडली आहे. आता त्यांच्या जागी टाटा (TATA) हे आयपीएलचे टायटल स्पॉन्सर असतील.' अशी क्रिकबझला माहिती दिली.

विवोशी (Vivo) झालेला आयपीएल टायटल स्पॉन्सरशिपचा करार अजून २ वर्षे शिल्लक होता. मात्र विवोच्या माघारीनंतर आता या दोन वर्षासाठी टाटा आयपीएलचा मुख्य स्पॉन्सर (IPL title sponsor) असणार आहे. आता आयपीएल ही टाटा आयपीएल (Tata IPL) म्हणून ओळखली जाईल.

विवोने २०१८ ला आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपचे ४४० कोटी रुपयांचे हक्क विकत घेतले होते. मात्र २०२० मध्ये ही भारत चीन यांच्यात सीमेवर स्टँड ऑफ झाल्यामुळे या कराराला स्थगिती देण्यात आली होती. यावेळी टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क ड्रीम इलेव्हनकडे हस्तांतरित करण्यात आले. विवो बरोबरचा टायटल स्पॉन्सरशिपचा करार हा २०२० पर्यंत होता. मात्र एक वर्ष आयपीएल (IPL) स्थगित झाल्याने हा करार २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आता विवोच्या माघारीनंतर आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने २०२२ आणि २०२३ च्या हंगामासाठी आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप टाटांकडे दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT