IND vs PAK Jay Shah  esakal
क्रीडा

IND vs PAK Jay Shah : सुरक्षा एजन्सीचा अहवाल येताच जय शहांनी दिल्लीत बोलावली तातडीची बैठक

अनिरुद्ध संकपाळ

IND vs PAK Jay Shah : भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपमधील सर्वात हाय व्होल्टेज सामना, भारत - पाकिस्तान सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआय आणि आयसीसीने गेल्या महिन्यातच वनडे वर्ल्डकपचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते. यावेळी पाकिस्तानने अहमदाबादमधील सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नाही.

जरी पाकिस्तानची मागणी बीसीसीआ आणि आयसीसीने धुडकावून लावली असली तरी या सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला काही सुरक्षा एजन्सींनी दिला आहे. यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी उद्या (दि. 27 जुलै) नवी दिल्ली येथे पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. (Ahmedabad)

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी वनडे वर्ल्डकप सामने ज्या राज्यात आयोजित केले जाणार आहेत त्या राज्याच्या असोसिएशनला पत्र पाठवले आहे. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंगमध्ये सहभागी होण्यास सांगितले आहे. या बैठकीत क्रिकेट बोर्ड हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या नव्या शेड्युलची माहिती देण्याची शक्यता आहे.

जय शहा यांनी लिहिलेल्या आपल्या पत्रात म्हणतात, सर्व असोसिएशनला लिहिलेल्या पत्रात सर्वांनी या बैठकीत सहभागी होण्यास साांगितले आहे. ते आपल्या पत्रात म्हणतात, 'मला वाटते की सर्वांनी या बैठकीत सहभाग नोंदवून या विषयी आपले मत व्यक्त करावे. या विषयी चर्चा करून निर्णय घेण्याची गरज आहे.' (ICC World Cup 2023)

'त्यामुळे आम्ही वर्ल्डकपचे सामने आयोजित करणाऱ्या सर्व राज्य संघटनांना विनंती करतो की सर्वांनी बैठकीला उपस्थिती लावावी.'

आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा सामना हा 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. सुरक्षा एजन्सींनीने बीसीसीआयला भारत - पाकिस्तान हा सामन्याची तारीख बदलावी अशी विनंती केली आहे. हा सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे गुजरातमध्ये प्रचंड गर्दी असते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

SCROLL FOR NEXT