bcci jay shah Sakal
क्रीडा

कोच होण्यासाठी भारतीय क्रिकेटचे सखोल ज्ञान असणाऱ्याला प्राधान्य! आम्ही पाँटिंग, लँगरशी संपर्क केलेला नाही- BCCI सचिव जय शहा

भारतीय क्रिकेटचे सखोल ज्ञान हा मुख्य निकष असणार आहे. असा प्रशिक्षक जो भारतीय संघाला आणखी उंचीवर नेणारा असेल, अशा व्यक्तीला आम्ही प्राधान्य देणार असल्याचे शहा म्हणाले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी आम्हाला अपेक्षित असलेला नवा प्रशिक्षक भारतीय क्रिकेटची खोलवर माहिती असलेला आणि येथील क्रिकेटची रचना जाणणारा असावा, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय माजी खेळाडूच नवा प्रशिक्षक होईल. परदेशी व्यक्तीला प्राधान्य मिळणार नाही, याचे संकेत शहा यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.

भारतीय संघासाठी योग्य प्रशिक्षक नियुक्त करणे ही सखोल प्रक्रिया आहे. भारतीय क्रिकेटच्या रचनेतून पुढे आलेला आणि आपल्या क्रिकेटची रचना उत्तमपणे जाणणाऱ्या व्यक्तींचा आम्ही शोध घेत आहोत, असे शहा यांनी सांगितले.

भारतीय क्रिकेटचे सखोल ज्ञान हा मुख्य निकष असणार आहे. असा प्रशिक्षक जो भारतीय संघाला आणखी उंचीवर नेणारा असेल, अशा व्यक्तीला आम्ही प्राधान्य देणार असल्याचे शहा म्हणाले. भारतीय क्रिकेटचे असे ज्ञान देशात क्रिकेट खेळलेल्याच व्यक्तीकडे असेल. त्यामुळे परदेशी व्यक्तीसुद्धा प्रशिक्षक असण्याची शक्यता संपुष्टात येत आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे विद्यमान प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांचेही नाव चर्चेत येत होते. धोनीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; परंतु चेन्नई संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही फ्लेमिंग या पदासाठी उत्सुक नसल्याचे सांगितले होते. बंगळूर संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांचेही नाव चर्चेत आले होते; परंतु त्यांनीही नकार दिलेला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षकपद हे सर्वांत मोठे पद आणि जबाबदारी आहे. भारतीय संघाचे चाहते जगभर पसरलेले आहे. त्यामुळे संघातील खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही तेवढाच सन्मान मिळत असतो. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा मोठा इतिहासही आहे, असे शहा म्हणाले.

पाँटिंग, लँगरशी संपर्क केलेला नाही ः जय शहा

भारतीय क्रिकेट संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक निवडण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणाशीही संपर्क साधलेला नाही, असे बीसीसीआय सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रिकी पाँटिंग आणि जस्टीन लँगर यांनी केलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मुदत संपल्यावर पुन्हा अर्ज करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे नव्या प्रशिक्षकपदासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने जाहिरात प्रसिद्ध करून शोध सुरू केला आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी बीसीसीआयकडून आपल्याशी संपर्क साधण्यात आला होता; परंतु आपण ऑफर नाकारल्याचे कालच सांगितले होते.

मी किंवा बीसीसीआयकडून कोणत्याही व्यक्तीने ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही माजी खेळाडूशी प्रशिक्षक होण्याबाबत संपर्क साधलेला नाही, काही प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झालेले वृत्त खोटे आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

पाँटिंग आणि लँगर हे आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या संघांचे प्रशिक्षक होते. आयपीएल स्पर्धेदरम्यान आपल्याशी संपर्क साधल्याचे या दोघांनी म्हटले होते. सध्या प्रशिक्षकपदासाठी भारताचा माजी खेळाडू आणि कोलकता संघाचा मेंटॉर गौतम गंभीर आघाडीवर आहे.

२७ मे ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. त्यानंतर नवा प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. राहुल द्रविड यांचा मुदतवाढ देण्यात आलेला कार्यकाल पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेबरोबर संपणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result : अन्सर कीमध्ये ६०९, निकाल लागताच ५४० पण दोन तासांनी १६७ गुण; नीट निकालात गोंधळ, विद्यार्थीनीचे गंभीर आरोप

IND vs ENG: लॉर्ड्सवर रोहित-कोहली रचणार इतिहास! सचिन-द्रविडलाही मागे टाकत करणार '400'चा महाविक्रम

Latest Marathi News Live Update : शिक्षण, आरोग्यसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबाबत सरकार अपयशी - AICC सरचिटणीस सचिन पायलट

Beed News: भ्रष्टाचार उघड होताच रातोरात काम सुरू? बीडमध्ये नेमकं काय घडलं?

सोनम वांगचुक यांची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी दिली अधिकृत माहिती, पत्नीचा रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT