BCCI Share Photo during Team India Take Off To England Fans Asked Where Is Captain Rohit Sharma
BCCI Share Photo during Team India Take Off To England Fans Asked Where Is Captain Rohit Sharma  esakal
क्रीडा

टीम इंडिया इंग्लंडला रवाना पण, नेटकरी म्हणतात 'गेला रोहित कुणीकडे'?

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : भारताचा कसोटी संघ इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी गुरूवारी पहाटे मुंबईवरून इंग्लंडला रवाना झाला. यावेळी बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून टीम इंडियाचे काही फोटो शेअर केले. याला 'इंग्लंड बाऊंड टीम इंडियाचा फोटो, संघ इंग्लंडसाठी रवाना' असे कॅप्शनही दिले. बीसीसीआयने शेअर केलेल्या या फोटोत विराट कोहली, मोहम्मद सिराज, चेतेश्वर पुजारा आणि जसप्रीत बुमराह दिसत आहेत. याचबरोबर दुखापतीतून सावरलेला रविंद्र जडेजा देखील होता. (BCCI Share Photo during Team India Take Off To England Fans Asked Where Is Captain Rohit Sharma)

पुजाराने शेअर केलेल्या फोटोत देखील विराट कोहली, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, शुभमन गिल, प्रसिद्ध कृष्णा आणि केएस भरत यांचा समावेश होता. पुजाराने या फोटोला 'पुढच्या आव्हानासाठी सज्ज, युके बाऊंड' असे कॅप्शन दिले. मात्र बीसीसीआयने शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुठेच दिसत नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी कर्णधार रोहित कुठे आहे असे प्रश्न विचारण्यास सुरूवात केली.

दरम्यान, संघाचा उपकर्णधार केएल राहुल देखील या फोटोमध्ये दिसत नाही. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार केएल राहुल अजून दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी तसेच मर्यादित षटकांची मालिका देखील मुकण्याची दाट शक्यता आहे. भारत गेल्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असा आघाडीवर होता. मात्र भारतीय संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागल्यामुळे पाचवा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. तो आता यावर्षी जुलै महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT