Harmanpreet Kaur Ind vs Ban w 3rd ODI  
क्रीडा

हरमनच्या 'त्या' कृत्यामुळे भारतीय क्रिकेटचं नाव बदनाम! वर्ल्डकप विजेता खेळाडू संतापला, BCCIला दिला सल्ला

सकाळ ऑनलाईन टीम

Harmanpreet Kaur Ind vs Ban w 3rd ODI : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर सध्या चर्चेत आहे. गेल्या शनिवारी 22 जुलै बांगलादेश आणि भारत यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना खेळला गेला, जो बरोबरीत संपला. या सामन्यात कॅप्टन कौर एलबीडब्ल्यू आऊट झाली होती, त्यानंतर तिने नाराजी व्यक्त करत अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

सामना संपल्यानंतर हरमनप्रीत कौरने बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाला तिच्यासोबत अंपायरला फोटोसाठी आणण्यास सांगितले, त्यानंतर यजमान संघाचा कर्णधार निघून गेला. आता या घटनेवर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वास्तविक, हरमनप्रीत कौरच्या वागण्याने मदन लाल निराश झाले. मदन लाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून भारतीय कर्णधाराच्या कृतीवर ट्विट करताना बीसीसीआयला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. मदन लाल यांनी लिहिले की, 'बांगलादेश महिला संघाविरुद्ध हरमनप्रीतचे वागणे लज्जास्पद होते. ती खेळापेक्षा मोठी नाही. यामुळे भारतीय क्रिकेटचे नाव खराब झाले आहे. बीसीसीआयने कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी.

विशेष म्हणजे, हरमनप्रीत कौरच्या वर्तणुकीवर आयसीसीही मोठा निर्णय घेऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, असे मानले जात आहे की आयसीसी हरमनप्रीत कौरवर मॅच फीच्या 75 टक्के दंड आकारू शकते. इतकंच नाही तर हरमनप्रीतवर 3 डिमेरिट पॉइंटही लागू होऊ शकतात. त्यानंतर आता तिला आणखी एक डिमेरिट पॉइंट मिळाला तर तिच्यावर एक कसोटी किंवा दोन मर्यादित षटकांच्या सामन्यांपासून बंदी घातली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT