ajit agarkar sakal
क्रीडा

Asia Cup 2023 : टीम इंडियाच्या निवडीसाठी BCCI मोडणार मोठा नियम? 'या' वेळी होणार संघाची घोषणा

Kiran Mahanavar

Team India Squad For Asia Cup 2023 : पाकिस्तान-श्रीलंका मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची सोमवारी (21 ऑगस्ट) घोषणा होणार आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ पुरुष निवड समितीची टीम निवडण्यासाठी नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला कर्णधार रोहित शर्माशिवाय कोच राहुल द्रविड देखील उपस्थित राहणार आहेत.

बैठकीनंतर अजित आगरकर दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा करतील. ही बैठक किती वाजता होणार आणि त्यात कोण कोण सहभागी होणार याची मोठी बातमी समोर आली आहे. यावेळी बीसीसीआयही संघ निवडीसाठी आपला मोठा नियम मोडणार आहे.

वृत्तानुसार, बीसीसीआय (भारतीय क्रिकेट बोर्ड) प्रथमच निवड बैठकीच्या परंपरेपासून दूर जात आहे. सोमवारी सकाळी दिल्लीत होणाऱ्या बैठकीला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील उपस्थित राहणार आहेत. जर द्रविडने या बैठकीला हजेरी लावली तर ते बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन होईल.

कारण भारतीय कोच संघ निवड बैठकीला उपस्थित राहत नाहीत. रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे हे कोच असताना निवड समितीच्या बैठकांमध्ये सहभागी झाले नव्हते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये, मुख्य प्रशिक्षक हा राष्ट्रीय निवड समितीचा भाग असतो, परंतु भारतात कोच किंवा कर्णधाराला निवडीच्या बाबतीत मत देण्याचा अधिकार नाही.

भारताचा संभाव्य संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, युझवेंद्र चहल किंवा रविचंद्रन अश्विन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात! गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा कायम, आज अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

Ketu Gochar 2026: जानेवारीत केतुची कृपा! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होणार सुवर्णकाळ

VIDEO : 'पप्पा, माझा एक बॉयफ्रेंड आहे, 11 वर्षांपासून मी त्याच्यावर..'; वडील-मुलीच्या हृदयस्पर्शी संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT