virat kohali
virat kohali virat kohali
क्रीडा

विराटचे एकदिवसीय कर्णधारपदही जाणार? बीसीसीआयकडे अनेक पर्याय

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकात भारत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून मिळालेल्या दारुण पराभवानंतर स्पर्धेच्या बाहेर होण्याची वेळ भारतावर आली आहे. आता जर-तरचे समीकरण जोडले जात आहे. असे असले तरी उपांत्य फेरी गाठणे जवळजवळ नाहीच्या बरोबरच आहे. यामुळेच की काय विराट कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

टी-२० विश्वचषकानंतर आपण कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने आधीच बीसीसीआयला सांगितले आहे. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये भारताला नवीन कर्णधार मिळणार आहे. यासाठी काही खेळाडूंच्या नावावर चर्चा सुरू आहे. विराटच्या नेतृत्वात सद्या भारताची सुमार कामगिरी सुरू आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व दुसऱ्या खेळाडूला देण्याचा विचार बीससीआय करू शकते.

एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये होऊ घातला आहे. यासाठी फार काळ शिल्लक राहिलेला नाही. आयसीसीच्या मालिकांमध्ये विराट कोहली अपयशी कर्णधार ठरला आहे. त्याला एकही आयसीसीची मालिका जिंकता आलेली नाही. हा रेकॉर्ड पाहता आताच कर्णधार बदललेला बरा. तसेही त्याचे वय वाढत चालले आहे. विश्वचषकापर्यंत तो ३४ ते ३५ वर्षांचा होऊन जाईल.

ऋषभ पंत

ऋषभ पंत टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होऊ शकतो. तो वयानेही कमी आहे. पंतने काही महिन्यांत चमकदार कामगिरी केली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर तो एकमेव यष्टिरक्षक आणि फलंदाज आहे जो ताबडतोब धावा काढू शकतो. त्यामुळेच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्‍ये त्याचे स्थान निश्चित झाले आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करताना पंतने चांगली कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यर

मुंबईचा २६ वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यर २०१७ मध्ये भारतीय संघात आला. अय्यरने आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याच्या नेतृत्वात २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०२३ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा तो प्रमुख दावेदार आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

केएल राहुल

केएल राहुललही कर्णधारपदाचा चांगला दावेदार होऊ शकतो. त्याची कामगिरीही चांगली आहे. अनेक वर्षांपासून तो भारतीय संघाशी जुळलेला आहे. आयपीएलमध्ये किंग इलेव्हन पंजाबसाठी कर्णधार म्हणून त्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच त्याने धावाही काढलेल्या आहेत. तेही विराट कोहलीला चांगला पर्याय ठरू शकतो.

रोहित शर्मा

भारताचा सलामीचा फलंदाज आणि हिट मॅन अशी उपाधी मिळालेला रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटचा सर्वांत चांगला पर्याय ठरू शकतो. त्याचे वय जास्त असले तरी तो संघाला विजय मिळवून देण्यात सक्षम आहे. त्याने आयपीएल कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. पाच आयपीएस टॉफी जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. विराटला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद दिले तर कोणाला आर्श्चय होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT