rohit sharma rahul dravid  
क्रीडा

Team India: BCCI ॲक्शन मोडमध्ये! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रोहित-द्रविडवर होणार मोठा निर्णय...

नव्या वर्षात टी-२० पराभवाची समीक्षा होणार

सकाळ ऑनलाईन टीम

भारतीय क्रिकेट संघाला टी-२० विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाची समीक्षा बीसीसीआयकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणाबाबत बीसीसीआयचे पदाधिकारी कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांना भेटणार आहेत.

या बैठकीला राहुल द्रविड यांच्यासोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांचीही उपस्थिती असणार आहे. एवढेच नव्हे तर २०२३मध्ये होणार असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकाची योजनाही तयार केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेटच्या निवड समितीच्या नवीन सदस्यांची मुलाखत २ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. क्रिकेट सल्लागार समितीने शुक्रवारी भारतीय क्रिकेट बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, त्यात नवीन निवड समिती सदस्यांची मुलाखत कशी घ्यायची याबद्दल चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. या क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा असून यामध्ये जतीन परांजपे आणि सुलक्षणा नाईक यांचाही समावेश आहे.

निवड समितीच्या अध्यक्ष पदासाठी व्यंकटेश प्रसाद, नयन मोंगिया, मनिंदर सिंग, सुब्रतो बॅनर्जी, शिव सुंदर दास या माजी खेळाडूंमध्ये कमालीची चुरस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT