Asia Cup 2023 BCCI Sending Team India to Pakistan ESAKAL
क्रीडा

Asia Cup 2023 : पुढच्या वर्षी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार; BCCI लागली तयारीला?

अनिरुद्ध संकपाळ

Asia Cup 2023 BCCI Sending Team India to Pakistan : पुढच्या वर्षीचा आशिया कप 2023 हा पाकिस्तानात होत आहे. त्यामुळे भारतीय संघ पुढचा आशिया कप खेळणार की नाही याबाबत साशंकता होती. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तयार आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा शेवटी भारत सरकारला घ्यायचा आहे. बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण बैठकीपूर्वी राज्य संघटनांना पत्र पाठवले आहे. या बैठकीत भारतीय संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्याबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तान हा 2023 चा वनडे आशिया कप आयोजिक करणार आहे. या स्पर्धेनंतर वनडे वर्ल्डकप भारतात होणार आहे. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक ही 18 ऑक्टोबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान याच्यात 2012 - 13 पासून कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. 2012 - 13 ला पाकिस्तानने तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. तेव्हापासून या दोन्ही देशांनी द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारत आणि पाकिस्तान हे आयसीसी स्पर्धेत आणि आशिया कपमध्येच एकमेकांना भिडतात.

भारताने शेवटचा पाकिस्तानचा दौरा 2005 - 6 मध्ये खेला होता. यावेळी संघाचे नेतृत्व राहुल द्रविड करत होता. या दौऱ्यावर भारताने तीन कसोटी आणि पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली होती. भारत आणि पाकिस्तान हे ऑस्ट्रलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमध्ये 23 ऑक्टोबरला एकमेकांना भिडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

SCROLL FOR NEXT