U-19 World Cup Sachin Dhas Century esakal
क्रीडा

U-19 World Cup : बीडच्या सचिन धसचा शतकी धमाका; नेपाळविरूद्ध भारताचा डाव सावरला

U-19 World Cup Sachin Dhas : सचिन धसच्या शतकामुळे भारताचा डाव सावरला

अनिरुद्ध संकपाळ

U-19 World Cup Sachin Dhas Century : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि नेपाळ यांच्यात लढत होत आहे. नेपाळविरूद्धच्या या सामन्यात भारताची अवस्था 3 बाद 62 धावा अशी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धसने शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. सचिन धसने 101 चेंडूत 116 धावा चोपल्या. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने कर्णधार उदय सहारनसोबत चौथ्या विकेटसाठी 215 धावांची दमदार भागीदारी रचली.

19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारत आणि नेपाळ यांच्यात सुपर 6 चा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नेपाळविरूद्ध भारताची सुरूवात खराब झाली.

आदर्श सिंह हा 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला प्रियांशू मोलिया 19 धावांची भर घालून माघारी परतला. दुसरा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी देखील 18 धावांवर आकाश चंदची शिकार झाला. भारताची अवस्था 3 बाद 62 धावा अशी झाली होती.

यानंतर कर्णधार उदय सहारन आणि सचिन धस यांनी भारताचा डाव सावरला. कर्णधाराच्या साथीने फलंदाजी करणाऱ्या धसने आक्रमक फलंदाजी करत 101 चेंडूत 116 धावा ठोकल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 215 धावांची दमदार भागीदारी रचत भारताला 277 धावांपर्यंत पोहचवले.

दरम्यान, गुलशन झाने ही जोडी फोडली. त्याने धसला 116 धावांवर बाद केलं. दुसऱ्या बाजूने उदय सहारन 90 धावांवर खेळत होता. त्याने धस बाद झाल्यानंतर आपले शतक पूर्ण केलं. मात्र शेवटच्या षकात गुलशनने त्याचीही शिकार केली. उदय सहारनने 107 चेंडूत 100 धावा केल्या. अखेर भारताने 50 षटकात 5 बाद 297 धावांपर्यंत पोहचला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : सात जन्मच काय; पण एक क्षणही पत्नी नको! पत्नी पीडितांची आगळीवेगळी 'पिंपळ पौर्णिमा', झाडाला घातल्या 108 उलट्या प्रदक्षिणा

Thane News : आता ऑपरेशन टायगर- ३? ठाकरेंचे १४ आमदार फोडण्याची तयारी, ८ जुलैला पुन्हा राजकीय भूकंपाची शक्यता

Latest Marathi News Live Update : अमरावतीमधील बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले

Solapur: आषाढीसाठी १० जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद, मंदिर परिसरात ‘नो व्हेईकल झोन’; स्वच्छता, आरोग्य, वाहतूक सुविधांवर भर

Vat Purnima : आज वटपौर्णिमा; सकाळी ६ ते १०.३० हा पूजेसाठी उत्तम कालावधी, दुपारी १२.०८ ते १२.५९ या वेळेतही करता येईल पूजा; भद्रा काळ वर्ज्य नाही

SCROLL FOR NEXT