Ben Stokes hits back at Harsha Bhogle  sakal
क्रीडा

Ben Stokes-Harsha Bhogle: मंकडिंग वरून दोन दिग्गज भिडले, ट्विटरवर भारत-इंग्लंड 'WAR'

हर्षा भोगलेने इंग्लंडच्या खेळाडूंच्या संस्कारावर आणि त्यांच्या विचारपद्धतीवर केला हल्लाबोल

Kiran Mahanavar

Ben Stokes-Harsha Bhogle : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वनडे सामना चर्चेचा विषय ठरला. भारताने शेवटची विकेट मंकडिंग पध्दतीने घेतली. त्यानंतर मात्र मालिकाच चर्चा विषय ठरली. भारताने तिसरा वनडे सामना 16 धावांनी जिंकला. इंग्लंडला भारताने ऐतिहासिक व्हाईट वॉश दिला. दिप्ती शर्माने नॉन स्ट्राईकरवर असलेल्या चार्ली डीनला चेंडू टाकण्यापूर्वीच धावबाद केले. यामुळे वाद निर्माण झाला. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी यावर आपले मत व्यक्त केले.

भारताचे दिग्गज समालोचक हर्षा भोगलेने या विषयावर एक दीर्घ टिप्पणी लिहिली, जी सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हर्षा भोगलेने इंग्लंडच्या खेळाडूंच्या संस्कारावर आणि त्यांच्या विचारपद्धतीवर हल्लाबोल केला. इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने आता हर्षा भोगलेच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे.

यातच, हर्षा भोगले यांच्या टीप्पणीवर इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज बेन स्टोक्सने ट्वीट करत प्रतिक्रीय दिली आहे. स्टोक ट्वीट करत म्हणाला की, 'हर्ष मंकडिंगच्या विषयावर लोकांनी व्यक्त केलेल्या मतांवर, तू संस्कृतीचा उल्लेख करत आहेस?'

तसेच, दुसर्‍या ट्विटमध्ये स्टोक्स म्हणाला की, '2019 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलला 2 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आजपर्यंत मला त्या फायनलबद्दल अनेक प्रकारचे मेसेज आले आहेत. ज्यात भारतीय चाहत्यांचे मेसेज देखील आहेत. चाहत्यांच्या या मेसेजवरुन तुमच्याशी संवाद साधू का?. ही गोष्ट संस्कृतीशी संबंधित आहे का? अजिबात नाही, लोक जगभरातून वेगवेगळ्या गोष्टींना मंकडिंगबद्दल संदेश पाठवत आहेत, केवळ इंग्लिश लोकच हे करत आहेत?

दुसरीकडे, दीप्ती शर्माच्या त्या रनआउटवर बराच गोंधळ झाला. या सामन्यानंतर चाहत्यांच्या आणि दिग्गज क्रिकेटपटूंच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहे. हर्षा भोगलेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन 8 ट्विट केले आहेत, ज्यात त्यांनी इंग्लंडवर शरसंधान साधले.

त्याचबरोबर, हर्षा भोगलेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, मला हे खूप त्रासदायक वाटते की इंग्लंडमधील मीडियाचा एक वर्ग गेमच्या नियमांनुसार खेळलेल्या मुलीला प्रश्न विचारत आहे. अनेकजण दिप्तीची कशी चूक झाली हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रिटीश क्रिकेटपटूसह चाहते तिची चुकी झाल्याचे वारंवार सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT