Ben Stokes posts angry tweet after his bag gets stolen in London's King's Cross Station  
क्रीडा

Ben Stokes : इंग्लंड कॅप्टन स्टोक्सला चोरट्याने आणलं रडकुंडीला! रेल्वे स्टेशनवरून बॅग केली लंपास

Kiran Mahanavar

Ben Stokes : इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स रविवारी एका दुर्दैवी घटनेला बळी पडला. जेव्हा एका चोराने त्याची रेल्वे स्टेशनवर बॅग चोरून नेली. खुद्द बेन स्टोक्सने एका ट्विटमध्ये याची पुष्टी केली आहे जी आता व्हायरल होत आहे.

ही घटना लंडनमधील किंग्स क्रॉस रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या घटनेनंतर स्टोक्स खूप निराश झाला. त्याने आपली निराशा बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. आपल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले, किंग्ज क्रॉस रेल्वे स्टेशनवर माझी बॅग कोणी चोरली. मला आशा आहे की माझे कपडे तुमच्यासाठी खूप मोठे आहेत.

बेन स्टोक्स गेल्या काही काळापासून इंग्लंडकडून सतत क्रिकेट खेळत होता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात स्टोक्सचा मोलाचा वाटा होता. यानंतर कसोटी संघाचे कर्णधार असताना त्याने त्याच्याच भूमीवर कसोटी मालिकेत पाकिस्तानचा 3-0 असा पराभव केला. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध खेळली गेलेली कसोटी मालिका अनिर्णित राहिली.

बेन स्टोक्सची गणना जगातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. यामुळेच गेल्या वर्षी आयपीएल 2023 साठी झालेल्या मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला 16.25 कोटी रुपये खर्चून विकत घेतले होते. स्टोक्स पूर्ण दोन वर्षांनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. दरम्यान, चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की स्टोक्स संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजय सत्तेपासून दूर राहिला तर कोण मारणार बाजी? स्टालिन फिरवू शकतात गेम, तर राज्यपालांकडे शेवटचा पर्याय

IPL 2026 Point Table: सनरायझर्स हैदराबादचा विजय अन् प्ले ऑफच्या शर्यतीत मोठी उलथापालथ; कूपर कॉनलीचे शतक व्यर्थ

llegal Mining Crackdown: धावत्या जेसीबीला लटकून ३ किमी पाठलाग; नायब तहसीलदारांची धाडसी कारवाई

विराटचा एकेकाळचा टीममेट, पंजाब किंग्जच्या माजी क्रिकेटरचं वयाच्या ३६व्या वर्षी निधन; युवराज म्हणाला, त्याच्यासोबत ड्रेसिंग रूम...

Crime: धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून पत्नीसोबत वाजलं; रागाच्या भरात पतीनं स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT