Ben Stokes | Usman Khawaja 
क्रीडा

ENG vs AUS : बेन स्टोक्सचा चक्रव्यूह अन् उस्मान भाईचा करेक्ट कार्यक्रम पाहा Video

Kiran Mahanavar

Eng vs Aus 1st Test Ashes 2023 : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रसिद्ध अॅशेस मालिका सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियासमोर पहिल्या डावात 393 धावा केल्यानंतर इंग्लंड संघाने पाहुण्या संघाला 386 धावांत गुंडाळून 7 धावांची आघाडी घेतली. यापुर्वी इंग्लंड क्रिकेट संघाने मैदानावर बरीच आक्रमकता दाखवली आहे.

ब्रेंडन मॅक्क्युलम मुख्य प्रशिक्षक आणि बेन स्टोक्स कर्णधार बनल्यानंतर इंग्लिश कसोटी संघात वेगळाच रंग पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळाले, यावेळी इंग्लंड संघाची आक्रमकता त्यांच्या फलंदाजी किंवा गोलंदाजीत नाही तर क्षेत्ररक्षणात दिसली.

कर्णधार बेन स्टोक्सने मैदानावर असा चक्रव्यूह निर्माण केला की, विरोधक संघासाठी डावात सर्वाधिक धावा करणारा शतकवीर फलंदाजही मैदानात पूर्णपणे सेट झाल्यानंतर असहाय्य दिसला आणि क्लीन बोल्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या 113व्या षटकात ही घटना घडली. ख्वाजा वैयक्तिक 141 धावांवर फलंदाजी करत होता.

ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्वाजा खेळपट्टीवर अगदी आरामात दिसत होता, पण त्यानंतर बेन स्टोक्सने ही खेळी केली. इंग्लिश कर्णधाराने फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी विचित्र क्षेत्ररक्षण लावले.

इंग्लिश संघाचे सहा खेळाडू ख्वाजाभोवती उभे होते, इथे ख्वाजाला विरोधी कर्णधाराची योजना समजण्याआधीच ऑली रॉबिन्सनने एक यॉर्कर चेंडू दिला ज्याची ख्वाजाला अजिबात अपेक्षा नव्हती. येथे ख्वाजाने चेंडूचा बचाव करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला आणि चेंडू ऑफ स्टंपला लागला, ज्यामुळे फलंदाजाचा डाव संपुष्टात आला.

या सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने आपल्या क्षेत्ररक्षणात आक्रमकता दाखवून ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर दबाव आणून विकेट मिळवली. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ यावर तोडगा काढू शकतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: उद्धव ठाकरेंचे 'हे' सहा खासदार दिल्लीत दाखल?, शिंदे दिल्लीकडे रवाना, उद्या लोकसभा अध्यक्षांची होणार भेट?

Pune News : नाट्यगृहाच्या आरक्षणासाठी ॲप अनिवार्य करणार; स्थायी समितीचा निर्णय

Vantara Confirms Madhuri Elephant Return Kolhapur : 'कोल्हापूरकर आम्ही माधुरी हत्तीला पाठवतोय'; वनताराने अखेर दिली कबुली; व्हिडिओ केला सादर

Uruli Kanchan Blood Donation : उरुळी कांचनमध्ये ड्रीम्स युवा फाउंडेशनचे विक्रमी ८०६ पिशव्या रक्तदान

Privatization of Schools : बहुमताच्या जोरावर शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT