Ben Stokes warns Australia to expect more fire from Jofra Archer 
क्रीडा

Ashes 2019 : कांगारुंनो सावधान! काहीही झालं तरी आर्चर बाउन्सर टाकणारच

वृत्तसंस्था

लंडन : बाउन्सर हीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची खरी ताकद आहे आणि त्यामुळेच तो तुफान मारा करतच राहणार, अशा श्ब्दांत इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियाला जणू इशारा दिला आहे. 

''हा खेळाचा एक भाग आहे आणि आर्चरच्या खेळाचा खूप महत्वाचा भाग आहे. आक्रमक गोलंदाजी करणे आणि फलंदाजाला जम बसवू न देणे ही आर्चरची स्टईल आहे. तो बाउन्सरच त्याची खरी ताकद आहे आणि तो बाउन्सर टाकतच राहणार,'' अशा शब्दांत त्याचे कौतुक केले. 

आर्चरचा चेंडू लागून स्विव्ह स्मिथला दुखापत झाली. त्यानंतर आता आर्चर पुन्हा बाउन्सर टाकणार की नाही अशी चर्चा सुरु झाली. त्यावर बोलताना स्टोक्स म्हणाला, ''सामना खेळताना कोणत्याही फलंदाजाला चेंडू लागून दुखापत झाली तरी कोणताही गोलंदाज मी पुन्हा असा चेंडू टाकणार नाही असे म्हणत नाही. फलंदाजाला चेंडू लागला की काळजी जरुर वाटते मात्र, जेव्हा गोलंदाज पुन्हा चेंडू टाकायला जातो तेव्हा त्याच्या मनात एकच गोष्ट असते की मला असाच चेंडू टाकायचा आहे.''

''आर्चर अशा लयीत गोलंदाजी करतो की तो कधी बाउन्सर टाकणार आहे हे कळतच नाही. त्याच्याकडे बघून असे वाटते की आता हा स्लो चेंडू टाकले मात्र, नेमके तेव्हाच तो बाउन्सर टाकतो,'' असे म्हणत त्याने आर्चर आमच्या संघात झालेला सर्वोत्तम बदल आहे असे स्पष्ट केले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT