Bengal-Warriors-vs-Puneri-Paltan
Bengal-Warriors-vs-Puneri-Paltan 
क्रीडा

Pro Kabaddi 2019 : अखेरचे 28 सेकंद पडले पुणेरी पलटणवर भारी

वृत्तसंस्था

कोलकता : प्रो-कबड्डीच्या मोसमात बचावातील क्षुल्लक चुकांमुळे पुणेरी पलटण संघाने रविवारी आणखी एक पराभव ओढवून घेतला. कोलकता टप्प्यात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने त्यांना 42-39 असे हरवले.

पंकज मोहितेच्या खोलवर चढाया आणि त्याला मनजीतकडून मिळालेल्या अष्यपैलू साथीमुळे मध्यंतराची 21-20 अशी पिछाडी भरून काढत पुणे संघाने सामन्याच्या अखेरच्या मिनिटापर्यंत 35-39 अशी आघाडी कायम राखली होती. मात्र, त्याचवेळी त्यांना अखेरची 28 सेकंद खेळून काढता आली नाहीत.

बंगालच्या नबीबक्षने पुण्याच्या तीन खेळाडूंमध्ये खोलवर चढाई करण्याचे केलेले धाडस यशस्वी ठरले. नबीबक्षची पकड करून त्याला जखडून ठेवण्याचे पुण्याच्या बचावफळीचे प्रयत्न फसले. त्याने आपला हात सोडवून घेत मध्य रेषेला टेकवला आणि तीन टचसह लोणचे दोन असे पाच गुण घेत सामना 40-39 असा फिरवला. त्यानंतर बलदेवने हाय फाईव्ह करताना मनजीतची पकड घेतली आणि अखेरच्या चढाईत मनिंदरने सुपर टेन साकार करून बंगालचा विजय साकार केला.

त्यापूर्वी दिल्लीने आपली 'दबंग'गिरी कायम राखताना गुणांचे अर्धशतक करत तमिळ थलैवाजचा 50-34 असा पराभव केला. दिल्लीकडून नवीनकुमारची आणखी एक सलग 'सुपर टेन' कामगिरी निर्णायक ठरली. त्याला मिराज शेखनेही 'सुपर टेन' कामगिरीची जोड दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT