mithali raj esakal
क्रीडा

मिताली राजला वडिलांमुळे विसरावं लागलं होतं पहिलं प्रेम

जेव्हा मितालीला भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची होती

धनश्री ओतारी

भारताची वनडे आणि कसोटी कर्णधार मिताली राजने बुधवारी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मितालीने ट्विट करत आपल्या चाहत्यांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.” असं तिन ट्विटमध्ये म्हंटल आहे. विशेष म्हणजे तिचं क्रिकेटवर कधीच प्रेम नव्हंत हे तिनं अनेकवेळा सांगितल आहे.

मितालीच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिने कायमच वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळतं. अवघ्या 10 वर्षांची असताना भरतनाट्यम किंवा क्रिकेट यापैकी एकाची निवड करायची वेळ आली त्यावेळी तिने क्रिकेटची निवड केली.

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मितालीने 26 जून 1999 साली आयरलँडविरोधातल्या सामन्यात वन-डेमध्ये डेब्यू केलं होतं.

भरतनाट्यमची होती आवड

मिताली राजचा जन्म ३ डिसेंबर १९८२ मध्ये जोधपुर येथे झाला. तिला भरतनाट्यमची आवड होती. तिचं पहिलं प्रेम भरतनाट्यम होत. हे तिनं अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर तिनं आपली आवड जपण्यासाठी तिनं ट्रेनिंगदेखील केल होत.

पण वडिलांच्या हट्टामुळे हातामध्ये बॅट घ्यावी लागली. मितालीचा भाऊ आणि वडील माजी क्रिकेटर आहेत. त्यांनी तिला क्रिकेट खेळण्याचे प्रोत्साहन दिलं. आणि तिला क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली.

मिताली राज हिच्या नावे याआधीही अनेक विक्रमांची नोंद आहे. भारताचा महिला क्रिकेट संघ 2006 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळण्यासाठी उतरला होता. त्यावेळी भारताची कर्णधार मिताली राज हीच होती. म्हणजेच भारतासाठी पहिली महिला टी-20 कर्णधार होण्याचा रेकॉर्ड मितालीच्या नावावरच कायम असेल.

मिताली राजच्या नावावर भारताकडून महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा रेकॉर्डही आहे. तिने टी-20 सा दोन हजारपेक्षाही जास्त धावा बनवलेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT