Bhavani Devi Won Gold Medal In Commonwealth Fencing Championship  esakal
क्रीडा

Bhavani Devi : भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पटकावले सुवर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Bhavani Devi Commonwealth Fencing Championship : भारताची आघाडीची तलवारबाज भवानी देवीने राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली. तिने गेल्यावेळी देखील सुवर्ण पदक जिंकले होते. जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या भारतीय तलवारबाज भवानी देवीने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या व्हेरोनिका व्हेसिलेवाचा 15 - 10 असा पराभव केला. भवानी देवी ही ऑलिम्पिकमध्ये पात्र झालेली पहिली भारतीय तलवारबाज आहे.

भवानी देवीने यंदाचा हंगाम इस्तंबुल येथील वर्ल्डकप पासून सुरू केला. मात्र तिला 23 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भवानी देवी कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या फेरीनंतर बाहेर पडली होती. आता राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा ही तिची या वर्षातील 10 वी स्पर्धा होती.

दरम्यान, राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भवानी देवी म्हणाली, 'अंतिम सामना खूप अवघड होता. मला भारतासाठी दुसरे सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद आहे. यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगले राहिले आहे. मला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. मला भारतातून मिळणारा पाठिंबा मोठा आहे.'

भारतीय तलवारबाजी संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी 'भवानी देवी ही भारतातील प्रत्येक तलवारबाजी करणाऱ्या खेळाडूसाठी प्रेरणा स्थान आहे. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठोवून अनेक तरूण खेळाडू जागितक स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटवण्याचे स्वप्न पाहत आहेत.'

भाटिया यांनी देखील भवानी देवीच्या सुवर्ण पदकानंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'या सुवर्ण पदकामुळे भारतात तलवारबाजी हा खेळ वाढत आहे असा विश्वास मिळतो. भारतीय तलवारबाज ऑलिम्पिकसह जागतिक स्पर्धेत सातत्याने खेळतील असाही मला विश्वास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

Latest Marathi News Live Update : मंडणगड साईनगर येथे ‘नाना - नानी पार्क’चे लोकार्पण

Vote Theft: दुबार मतदान झालंय हे भाजपाने अखेर मान्य केले? आशिष शेलारांच्या 'त्या' वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Male Breast Cancer : महिलांप्रमाणे पुरुषांनाही होऊ शकतो ‘स्तनाचा कर्करोग’ ; जाणून घ्या, नेमकी लक्षणे काय?

SCROLL FOR NEXT